दानवेंसाठी मुख्यमंत्री मैदानात, जालन्यात खोतकरांची बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न

दानवेंसाठी मुख्यमंत्री मैदानात, जालन्यात खोतकरांची बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न

गेल्या पाच वर्षांत जालन्यात तयार झालेला संघर्ष हा या दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता

  • Share this:

जालना, 04 मार्च : जालना मतदारसंघातून चार वेळा निवडून गेलेल्या भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी आता भाजपकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्यावतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख हे अर्जुन खोतकर यांचे मन वळवण्यासाठी जालन्यात जाणार असल्याचे समजते.

जालना लोकसभा मतदार संघाच्या मैदानातून मी अजून बाहेर पडलो नसल्याचे खोतकर यांनी म्हटले होत. तसेच याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकर यांच्याशी बोललो असून त्यांना भेटणार असल्याचेही खोतकरांनी म्हटले होते. शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर एकाच मंचावर आले होते. पण तिथेही अर्जुन खोतकर यांनी आपण जालना लोकसभेच्या मैदानात असल्याचे म्हटले होते.

स्वबळाचा निर्धार करणारी शिवसेना आणि पटक देंगेचा इशारा देणारी भाजपा अखेर एकत्र आली. पण असं असलं तरीही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गेल्या पाच वर्षांत तयार झालेला संघर्ष हा या दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेचे अर्जुन खोतकर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात उभे राहण्यावर ठाम आहेत.

दरम्यान, काही दिवासांपूर्वीही एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दानवे-खोतकर यांच्यात दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला होता. पण खोतकर आपल्या भूमिकेवर ठाम होते.

VIDEO पंकजा मुंडेंनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाल्या पवारसाहेब 'या' अभिनेत्यासारखे

First published: March 4, 2019, 7:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading