वीज दरवाढीचा 'शॉक' ; 55 टक्के वाढीचा प्रस्ताव

वीज दरवाढीचा 'शॉक' ; 55 टक्के वाढीचा प्रस्ताव

23 ऑक्टोबरऐन दिवाळीत लोडशेडिंगने वैतागलेल्या लोकांना आता वीजदरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. वीज नियामक आयोगाने पंच्चावन टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. याकरीता लोकांची मत जाणून घेण्यासाठी कोकण विभागाची जनसुनावणी नवी मंबईत झाली. या सुनावणीत दरवाढ रद्द करण्यासाठी मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर सर्वच नागरिकांनी दरवाढ करण्यास विरोध केला आहे. या नव्या दरवाढीमध्ये सरकारला 55 टक्के दरवाढ अपेक्षित आहे. आज सुरू असलेल्या जनसुनावणी कोकण विभागातील नागरीक उपस्थित आहेत. महावितरणने या दरवाढीची काय कारणं दिली आहेत 1) वीज कंपनीला हवीय 7121 कोटींची दरवाढ2) वीज तुटीमुळे वीज दरवाढ गरजेची3) भिजलेला कोळसा आणि जुन्या मशीनमुळे उत्पादनात घट4) 0 ते 300 युनिटपर्यंत प्रती युनिट 2 रुपये 68 पैसे दरवाढ अपेक्षित तर नागरिकांची काय भूमिका आहे 1) वीज दरवाढ रद्द करावी.2) मागील 6 वर्षात कोळसा उत्पादनावर का विचार केला नाही.3) वीज उत्पादन कमी करणार्‍या आणि वीजेची तूट येणार्‍यांचे परवाने रद्द करावे.4) जन सुनावनी MSEB च्या डिव्हिझन प्रमाणे करावी.5) ही दरवाढ सर्वसामान्य लोकांवर लादली जातेय.वीज दरवाढीचा प्रस्ताव एकीकडे आहे ते दुसरीकडे लोडशेडिंगची टांगती तलवार आहेच आणि ग्रामीण भागात दिवाळीतही लोडशेडिंग सुरु आहे. दिवाळीच्या काळात राज्यात कमीत कमी लोडशेडिंग करू असं उर्जामंत्री अजित पवार यांनी सांगितलं. दुसर्‍या राज्यातूनही वीज घेण्याचा सरकारचा विचार असल्याचंही अजित पवार म्हणाले. जेजुरीमध्ये नगरपरिषदेच्या इमारतीचं उद्घाटन आज झालं, त्यावेळी पवार बोलत होते.

  • Share this:

23 ऑक्टोबर

ऐन दिवाळीत लोडशेडिंगने वैतागलेल्या लोकांना आता वीजदरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. वीज नियामक आयोगाने पंच्चावन टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. याकरीता लोकांची मत जाणून घेण्यासाठी कोकण विभागाची जनसुनावणी नवी मंबईत झाली. या सुनावणीत दरवाढ रद्द करण्यासाठी मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर सर्वच नागरिकांनी दरवाढ करण्यास विरोध केला आहे. या नव्या दरवाढीमध्ये सरकारला 55 टक्के दरवाढ अपेक्षित आहे. आज सुरू असलेल्या जनसुनावणी कोकण विभागातील नागरीक उपस्थित आहेत.

महावितरणने या दरवाढीची काय कारणं दिली आहेत 1) वीज कंपनीला हवीय 7121 कोटींची दरवाढ2) वीज तुटीमुळे वीज दरवाढ गरजेची3) भिजलेला कोळसा आणि जुन्या मशीनमुळे उत्पादनात घट4) 0 ते 300 युनिटपर्यंत प्रती युनिट 2 रुपये 68 पैसे दरवाढ अपेक्षित

तर नागरिकांची काय भूमिका आहे 1) वीज दरवाढ रद्द करावी.2) मागील 6 वर्षात कोळसा उत्पादनावर का विचार केला नाही.3) वीज उत्पादन कमी करणार्‍या आणि वीजेची तूट येणार्‍यांचे परवाने रद्द करावे.4) जन सुनावनी MSEB च्या डिव्हिझन प्रमाणे करावी.5) ही दरवाढ सर्वसामान्य लोकांवर लादली जातेय.वीज दरवाढीचा प्रस्ताव एकीकडे आहे ते दुसरीकडे लोडशेडिंगची टांगती तलवार आहेच आणि ग्रामीण भागात दिवाळीतही लोडशेडिंग सुरु आहे. दिवाळीच्या काळात राज्यात कमीत कमी लोडशेडिंग करू असं उर्जामंत्री अजित पवार यांनी सांगितलं. दुसर्‍या राज्यातूनही वीज घेण्याचा सरकारचा विचार असल्याचंही अजित पवार म्हणाले. जेजुरीमध्ये नगरपरिषदेच्या इमारतीचं उद्घाटन आज झालं, त्यावेळी पवार बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2011 09:37 AM IST

ताज्या बातम्या