समझोता स्फोटातील आरडीएक्सचा गुंता कायम

समझोता स्फोटातील आरडीएक्सचा गुंता कायम

18 नोव्हेंबर, मुंबई समझोता एक्सप्रेसच्या स्फोटात वापरलेलं आरडीएक्स नेमकं कुठून आलं, ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. लष्कराकडून मिळवलेल्या आरडीएक्सचाच वापर समझोता स्फोटात झाला होता, हा निष्कर्षही महाराष्ट्र एटीएसनं मागे घेतलाय. लष्कराकडून गहाळ झालेलं 60 किलो आरडीएक्सही कर्नल पुरोहितच्या ताब्यात असावं आणि पुरोहित यानंच समझोता एक्स्प्रेसमधल्या स्फोटासाठी आरडीएक्स पुरवलं असावं, असा तर्क आता केला जातोय.लष्कराचं असं म्हणणं आहे की, लष्करात आरडीएक्सचा वापरही होत नाही आणि ते लष्करात त्याचा साठाही केला जात नाही. लष्करात सामान्यपणे टीएनटी किंवा प्लास्टिक एक्स्लोझिव्ह वापरली जातात. जम्मू काश्मीर वा अन्य कुठेही कारवाईत लष्करांनं ताब्यात घेतलेलं आरडीएक्स एकतर नष्ट केलं जातं किंवा स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केलं जातं. त्यामुळं कर्नल पुरोहितला लष्कराकडून आरडीएक्स मिळण्याची शक्यता नाही आणि मोठया प्रमाणावर आरडीएक्स गहाळ झालं तर त्यांची उच्चस्तरीय चौकशी केली जाते. 60 किलो आरडीएक्स जर गहाळ झालं असतं तर त्यांची चौकशी नक्कीच झाली असती. पुरोहित मुळातच काश्मीरमध्ये पोस्टींगला असताना ते गुप्तचर विभागात मेजरसारख्या लहान हुद्यावर होते. इतक्या लहान हुद्यावर असलेल्या व्यक्तीला इतक्या मोठया प्रमाणावरच्या आरडीएक्सची अफरातफर करणं शक्य होईल, असंदिसत नाही तसंच पुरोहित लष्करात असेपर्यंत त्यानं कधीही बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. दरम्यान, याप्रकरणी चौकशी नंतर काय ते बोलता येईल, असा पवित्रा सर्वांना घेतलाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी मिडियालाही या प्रकरणावर शांत राहण्याचं आवाहन केलंय. त्यामुळं समझोतामधलं आरडीएक्स कोठून आलं ते स्पष्ट होण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2008 06:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading