सातार्‍यात आणखी दिडशे नकुसा मुलींचे नामकरण

सातार्‍यात आणखी दिडशे नकुसा मुलींचे नामकरण

22 ऑक्टोबरमुलगा हवाच या हट्टापोटी जन्माला आलेली मुलगी नको असली की तिचं नाव नकोशी ठेवलं जातं. अशा नकोशी नावाच्या मुलींची संख्या सातारा जिल्ह्यात दोनशेहून जास्त आहे. त्यातल्या दिडशे मुलींचं आज सातार्‍यात नामकरण करण्यात आलं. गेल्या वर्षी सातारा आरोग्य विभागाने नकोशी नाव असलेल्या मुलींचा शोध घेतला होता. त्यात 222 मुलींची नावं नकोशी असल्याचं आढळलं होतं. आज सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या नामकरण सोहळ्यात या मुलींना स्वत:च्या आवडीचं नाव मिळाली. या नकुसा नावाच्या मुलींचं जगणं आणि त्यांच्या नावामागची कहाणी आयबीएन-लोकमतने रिपोर्ताज या आमच्या कार्यक्रमात दाखवली होती. नकुसा नावाच्या मुली घरात गरिबी असलेल्या कुटुंबातील आहेत. तसेच यातल्या अनेकींनी गरिबीमुळे शिक्षण सोडलं आहे. या कार्यक्रमाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने या मुलींच्या शिक्षण आणि आरोग्याकडे विशेष लक्ष पुरवण्यात येईल असं आश्वासन दिलं.

  • Share this:

22 ऑक्टोबर

मुलगा हवाच या हट्टापोटी जन्माला आलेली मुलगी नको असली की तिचं नाव नकोशी ठेवलं जातं. अशा नकोशी नावाच्या मुलींची संख्या सातारा जिल्ह्यात दोनशेहून जास्त आहे. त्यातल्या दिडशे मुलींचं आज सातार्‍यात नामकरण करण्यात आलं. गेल्या वर्षी सातारा आरोग्य विभागाने नकोशी नाव असलेल्या मुलींचा शोध घेतला होता. त्यात 222 मुलींची नावं नकोशी असल्याचं आढळलं होतं. आज सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या नामकरण सोहळ्यात या मुलींना स्वत:च्या आवडीचं नाव मिळाली. या नकुसा नावाच्या मुलींचं जगणं आणि त्यांच्या नावामागची कहाणी आयबीएन-लोकमतने रिपोर्ताज या आमच्या कार्यक्रमात दाखवली होती. नकुसा नावाच्या मुली घरात गरिबी असलेल्या कुटुंबातील आहेत. तसेच यातल्या अनेकींनी गरिबीमुळे शिक्षण सोडलं आहे. या कार्यक्रमाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने या मुलींच्या शिक्षण आणि आरोग्याकडे विशेष लक्ष पुरवण्यात येईल असं आश्वासन दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2011 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading