वैद्यकीय संघटनेचे 12 हजार डॉक्टर संपावर

वैद्यकीय संघटनेचे 12 हजार डॉक्टर संपावर

11 ऑक्टोबरमहाराष्ट्र राज्य वैद्यकीय संघटनेचे राज्यातील 12 हजार डॉक्टर्स आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी आज संपावर गेले आहेत. 2009 पासून सहावा वेतन आयोग लागू करावा, डॉक्टरांना प्रॅक्टीसिंग अलाऊन्स दिला जावा, आयुर्वेदिक तसेच ऍलोपॅथीच्या जवळपास 1500 डॉक्टरांना कायम सेवेत सामावून घ्यावं. डॉक्टरांच्या कामांचे तास निश्चित करावेत. डॉक्टरांच्या या काही मागण्या आहेत. शिवाय पोस्टमॉर्टेम आणि मेडिको लिगल केसेस शिवाय कोणतंय काम केलं जाणार नाही असंही डॉक्टारांनी नमुद केलं आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत आपल्या मागण्यांबाबत योग्य निर्णय न घेतल्यास संपुर्ण काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा डॉक्टरांनी दिला. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि पोलिस हॉस्पिटल अशा एकूण राज्यातील 2500 रुग्णालयांवर या संपाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

11 ऑक्टोबर

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय संघटनेचे राज्यातील 12 हजार डॉक्टर्स आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी आज संपावर गेले आहेत. 2009 पासून सहावा वेतन आयोग लागू करावा, डॉक्टरांना प्रॅक्टीसिंग अलाऊन्स दिला जावा, आयुर्वेदिक तसेच ऍलोपॅथीच्या जवळपास 1500 डॉक्टरांना कायम सेवेत सामावून घ्यावं. डॉक्टरांच्या कामांचे तास निश्चित करावेत. डॉक्टरांच्या या काही मागण्या आहेत. शिवाय पोस्टमॉर्टेम आणि मेडिको लिगल केसेस शिवाय कोणतंय काम केलं जाणार नाही असंही डॉक्टारांनी नमुद केलं आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत आपल्या मागण्यांबाबत योग्य निर्णय न घेतल्यास संपुर्ण काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा डॉक्टरांनी दिला. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि पोलिस हॉस्पिटल अशा एकूण राज्यातील 2500 रुग्णालयांवर या संपाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

First published: October 11, 2011, 10:07 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading