गुजरातमध्ये उपवास स्पर्धा सुरु

गुजरातमध्ये उपवास स्पर्धा सुरु

17 सप्टेंबरगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आजपासून आपल्या उपवासाला म्हणजेच सद्भावना मिशनला सुरुवात केली आहे. या मिशनअंतर्गत मोदी 3 दिवस मोदी उपवास करणार आहेत. मोदींच्या या इव्हेंटमध्ये भाजपचे अनेक ज्येष्ठ नेतेही सहभागी झालेत. तर दुसरीकडे मोदींच्या उपवासाला टक्कर देण्यासाठी, गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनीही साबरमतीमध्ये उपवासाला सुरुवात केली आहे.मोदींवर कुरघोडी करत त्यांनी आठ वाजताच उपवासाला सुरुवात केली. मोदींचा उपवास म्हणजे निव्वळ नाटकं असल्याची टीकाही वाघेलांनी यावेळी केली . त्यामुळे गुजरातमध्ये आजपासुन उपवासाचं एक नवं राजकारण सुरू झालेलं पाहायला आहे. दरम्यान शिवसेनेनं मोदींच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. उद्या शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत मोदींना पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत.सहानुभूती व्यक्त करण्यासाठी मोदींना 9 वर्ष ?मोदींच्या 3 दिवसांच्या उपोषणाला सुरुवात झाली. गुजरात दंगल पीडितांप्रति अतीव दु:ख आणि सहानुभूती व्यक्त करत त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. पण दंगलीच्या आगीत होरपळलेल्यांच्या जखमांवर मोदींचे हे शब्द फूंकर घालू शकले नाही. सहानुभूती व्यक्त करण्यासाठी मोदींना 9 वर्ष का लागली असा सवाल हे दंगल पीडित विचारत आहे. मोदी जेव्हा अहमदाबादच्या आलीशान अशा एसी हॉलमध्ये उपोषणाची सुरुवात करत होते त्याच वेळी शहरातल्या एका झोपडपट्टीत रुपा आणि दारा मोदी गरिबांना जेवण देत होत्या. या दाम्पत्याचा 11 वर्षांचा मुलगा गुजरातमध्ये 28 फेब्रुवारी 2002 रोजी झालेल्या दंगलीत मारला गेला. त्या दंगलपीडितांबद्दल सहानुभूती व्यक्त करायला नरेंद्र मोदींना 9 वर्ष का लागली, असा साधा प्रश्न या जोडप्याला पडला. सामाजिक कार्यकर्त्या आणि कट्टर मोदी विरोधक असलेल्या मल्लीका साराभाई यांच्या मते मोदींचं मनपरिवर्तन अजून झालेलं नाही. त्यांच्या मते मोदींची सहानुभूती शब्दातून नाही तर कृतीतून दिसली पाहिजे. मल्लिका साराभाई म्हणतात, आधी भ्रष्टाचार मुळापासून संपवा तेव्हाच आम्ही तुमच्या सोबत येऊ.रुपा आणि दारासारखे असे हजारो दंगल पीडित आहे ज्यांच्या मते मोदींचा उपवास म्हणजे फक्त देखावा आहे. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे एक साधन आहे.

  • Share this:

17 सप्टेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आजपासून आपल्या उपवासाला म्हणजेच सद्भावना मिशनला सुरुवात केली आहे. या मिशनअंतर्गत मोदी 3 दिवस मोदी उपवास करणार आहेत. मोदींच्या या इव्हेंटमध्ये भाजपचे अनेक ज्येष्ठ नेतेही सहभागी झालेत. तर दुसरीकडे मोदींच्या उपवासाला टक्कर देण्यासाठी, गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनीही साबरमतीमध्ये उपवासाला सुरुवात केली आहे.मोदींवर कुरघोडी करत त्यांनी आठ वाजताच उपवासाला सुरुवात केली. मोदींचा उपवास म्हणजे निव्वळ नाटकं असल्याची टीकाही वाघेलांनी यावेळी केली . त्यामुळे गुजरातमध्ये आजपासुन उपवासाचं एक नवं राजकारण सुरू झालेलं पाहायला आहे. दरम्यान शिवसेनेनं मोदींच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. उद्या शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत मोदींना पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत.

सहानुभूती व्यक्त करण्यासाठी मोदींना 9 वर्ष ?

मोदींच्या 3 दिवसांच्या उपोषणाला सुरुवात झाली. गुजरात दंगल पीडितांप्रति अतीव दु:ख आणि सहानुभूती व्यक्त करत त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. पण दंगलीच्या आगीत होरपळलेल्यांच्या जखमांवर मोदींचे हे शब्द फूंकर घालू शकले नाही. सहानुभूती व्यक्त करण्यासाठी मोदींना 9 वर्ष का लागली असा सवाल हे दंगल पीडित विचारत आहे.

मोदी जेव्हा अहमदाबादच्या आलीशान अशा एसी हॉलमध्ये उपोषणाची सुरुवात करत होते त्याच वेळी शहरातल्या एका झोपडपट्टीत रुपा आणि दारा मोदी गरिबांना जेवण देत होत्या. या दाम्पत्याचा 11 वर्षांचा मुलगा गुजरातमध्ये 28 फेब्रुवारी 2002 रोजी झालेल्या दंगलीत मारला गेला. त्या दंगलपीडितांबद्दल सहानुभूती व्यक्त करायला नरेंद्र मोदींना 9 वर्ष का लागली, असा साधा प्रश्न या जोडप्याला पडला.

सामाजिक कार्यकर्त्या आणि कट्टर मोदी विरोधक असलेल्या मल्लीका साराभाई यांच्या मते मोदींचं मनपरिवर्तन अजून झालेलं नाही. त्यांच्या मते मोदींची सहानुभूती शब्दातून नाही तर कृतीतून दिसली पाहिजे. मल्लिका साराभाई म्हणतात, आधी भ्रष्टाचार मुळापासून संपवा तेव्हाच आम्ही तुमच्या सोबत येऊ.

रुपा आणि दारासारखे असे हजारो दंगल पीडित आहे ज्यांच्या मते मोदींचा उपवास म्हणजे फक्त देखावा आहे. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे एक साधन आहे.

First published: September 17, 2011, 9:38 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading