बहिणीला कामावरून काढले म्हणून भावाचे आत्मदहन

02 ऑगस्टमुंबईत उल्हासनगर महापालिकेसमोर एका तरुणाने आज आत्मदहन केलं. त्यात त्याचा मृत्यू झाला. आपल्या बहिणीला महापालिकेतल्या अधिकार्‍यांकडून त्रास होत होता असा त्या तरुणाचा आरोप होता. प्रशांत लहाने असं या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने स्वतला जाळून घेतले आणि तशाच अवस्थेत तो थेट उल्हासनगर महानगरपालिकेत शिरला. प्रशांतची बहिण उल्हासनगर महानगरपालिकेत सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत शिक्षण मंडळात कामाला होती. तिच्यावर अन्याय करून तिला कामावरून कमी केलं. त्याची तक्रार तिने महापालिका आयुक्तांपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत केली होती. पण कोणीच दखल घेतली नाही म्हणून प्रशांतने स्वतःला जाळून घेतले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2011 01:07 PM IST

बहिणीला कामावरून काढले म्हणून भावाचे आत्मदहन

02 ऑगस्ट

मुंबईत उल्हासनगर महापालिकेसमोर एका तरुणाने आज आत्मदहन केलं. त्यात त्याचा मृत्यू झाला. आपल्या बहिणीला महापालिकेतल्या अधिकार्‍यांकडून त्रास होत होता असा त्या तरुणाचा आरोप होता. प्रशांत लहाने असं या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने स्वतला जाळून घेतले आणि तशाच अवस्थेत तो थेट उल्हासनगर महानगरपालिकेत शिरला.

प्रशांतची बहिण उल्हासनगर महानगरपालिकेत सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत शिक्षण मंडळात कामाला होती. तिच्यावर अन्याय करून तिला कामावरून कमी केलं. त्याची तक्रार तिने महापालिका आयुक्तांपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत केली होती. पण कोणीच दखल घेतली नाही म्हणून प्रशांतने स्वतःला जाळून घेतले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2011 01:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...