मुंबई-उपनगरात पावसाचे धूमशान

30 जुलैमुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगले झोडपले आहे. मुंबई काल रात्रभर पावसाच्या संततधार सुरू होत्या. तसेच आसपासच्या जिल्ह्यातही पावसाने धूमशान घातले आहे. ठाणे,वसई विरार, पालघर, विक्रमगड, डहाणू या ठिकाणी पावसामुळे नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे. काल रात्री एका बारा वर्षाच्या मुलीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. ठाणे शहर, पालघर आणि वसईत पावसानं जोरदार हजेरी लावली आहेत. शहरात दमदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना फटका बसला आहे. तीन पेट्रोल पंप, वंदना टॉकीज, घंटाळी रोड, वसंत विहार या भागातल्या रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूकीलाही याचा फटका बसला. वसई- विरार तुडूंब तर वसई- विरारमध्येही रात्रीपासून पावसाने धूमशान घातले आहे. नवघर डेपो, तसेच नालासोपारा इथल्या अनेक भागात पाणी साचले आहे. संतोष भुवन , सेंट्रल पार्क, महेश पार्क , तुळींज रोड इथेही हीच परिस्थिती आहे. तसेच भाताणे पूल पाण्याखाली गेला आहे. भरती असल्याने पावसाचा जोर कायम आहे. वसई तालुक्यात गेल्या 24 तासांत 97 मिमी पाऊस पडला. एका मुलीचा मृत्यूपालघर, विक्रमगड, डहाणू तालुक्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहेत. नद्यांवरील पुलावरून पाणी जात असल्याने अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झालीय. पालघर आणि मनोर शहराला जोडणारा मासवण पूल गेल्या दोन दिवसांपासून पाण्याखाली गेलाय. त्यामुळे इथं राहणार्‍या लोकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. नानिवली इथं एका बारा वर्षाच्या मुलीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज पावसाचा जोर कमी झाल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे डहाणूचे उपविभागीय अधिकार्‍यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2011 09:55 AM IST

मुंबई-उपनगरात पावसाचे धूमशान

30 जुलै

मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगले झोडपले आहे. मुंबई काल रात्रभर पावसाच्या संततधार सुरू होत्या. तसेच आसपासच्या जिल्ह्यातही पावसाने धूमशान घातले आहे. ठाणे,वसई विरार, पालघर, विक्रमगड, डहाणू या ठिकाणी पावसामुळे नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे. काल रात्री एका बारा वर्षाच्या मुलीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. ठाणे शहर, पालघर आणि वसईत पावसानं जोरदार हजेरी लावली आहेत. शहरात दमदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना फटका बसला आहे. तीन पेट्रोल पंप, वंदना टॉकीज, घंटाळी रोड, वसंत विहार या भागातल्या रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूकीलाही याचा फटका बसला.

वसई- विरार तुडूंब

तर वसई- विरारमध्येही रात्रीपासून पावसाने धूमशान घातले आहे. नवघर डेपो, तसेच नालासोपारा इथल्या अनेक भागात पाणी साचले आहे. संतोष भुवन , सेंट्रल पार्क, महेश पार्क , तुळींज रोड इथेही हीच परिस्थिती आहे. तसेच भाताणे पूल पाण्याखाली गेला आहे. भरती असल्याने पावसाचा जोर कायम आहे. वसई तालुक्यात गेल्या 24 तासांत 97 मिमी पाऊस पडला.

एका मुलीचा मृत्यू

पालघर, विक्रमगड, डहाणू तालुक्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहेत. नद्यांवरील पुलावरून पाणी जात असल्याने अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झालीय. पालघर आणि मनोर शहराला जोडणारा मासवण पूल गेल्या दोन दिवसांपासून पाण्याखाली गेलाय.

त्यामुळे इथं राहणार्‍या लोकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. नानिवली इथं एका बारा वर्षाच्या मुलीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज पावसाचा जोर कमी झाल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे डहाणूचे उपविभागीय अधिकार्‍यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2011 09:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...