Elec-widget

नीलिमा मिश्रा,हरिश हांडे यांना मॅगसेसे पुरस्कार

नीलिमा मिश्रा,हरिश हांडे यांना मॅगसेसे पुरस्कार

27 जुलैआशिया खंडातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2011 चे रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाले आहेत. हरिष हांडे आणि नीलम मिश्रा या दोघा भारतीयांना हा पुरस्कार मिळाला. नोबेलनंतर आशियाचा हा प्रतिष्ठीत पुरस्कार समजला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सहा जणांना हा पुरस्कार मिळाला. विजेत्यांना प्रमाणपत्र, एक मेडल आणि रोख बक्षीस दिलं जाईल. 31 ऑगस्ट रोजी फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये पुरस्कार वितरण सोहळा होईल. फिलीपाईन्सचे लोकप्रिय अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो. त्यांच्या 1957 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. यावेळचे मॅगसेसे पुरस्कार विजेते हरिश हांडे यांनी सौरऊर्जेच्या तंत्रज्ञानात मोलाचं योगदान दिलंय. तर नीलिमा मिश्रा यांनी बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महिलांसाठी मोठं काम केलं. यापूर्वी आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, मदर तेरेसा, अरुण शौरी, टी. एन. सेशन आणि किरण बेदी यांना हा पुरस्कार मिळाला होता. नीलम मिश्रा यांच्याबद्दलघरातल्या वापरात नसलेल्या कपड्यांची गोधडी हा आपल्याकडील पारंपरिक प्रकार. याच पारंपरिक कलेला रोजगाराची जोड दिली भगिनी निवेदता बचतगटाने. त्यामुळे बहादरपूरच्या या महिला वर्षाचे बाराही महिने बिझी असतात. बचतगटातल्या महिलांना खरं पाठबळ मिळाले ते ऑस्ट्रेलियाच्या ऍनी गॉडफ्रे यांचं. ऍनीनं या गोधडीला परदेशात मार्केट उपलब्ध करुन दिलं. आणि गेल्या 7 वर्षापासून कष्टाची ही गोधडी आता जगातील 7 देशांमधे पोहोचली. आज 1800 बचतगटांच्या हा समुहात 16 हजारच्या आसपास महिला काम करतात. अगदी 16 वर्षांपासून ते सत्तरी ओलांडलेल्या. त्यांच्या हॅण्डमेड गोधड्या दर वर्षाला एक नवा देश ओलांडत आहे.हरिश हांडेंची कारकीर्द- जन्म 1967, बंगळुरू- अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून एनर्जी इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्सची पदवी - रुरल इलेक्ट्रिफिकेशन या विषयात पीएचडी - सेल्को इंडिया या सामाजिक संस्थेचे सहसंस्थापक - ग्रामीण भागात तंत्रज्ञनाच्या मदतीने गरिबी दूर करण्याचे कार्य- बंगळुरूमध्ये हेडक्वार्टर, कर्नाटक आणि गुजरातमध्ये 25 शाखा - ग्रामीण भागातल्या जवळपास 1 लाख 20 हजार घरांमध्ये सौर ऊर्जेची यंत्रणा बसवली - आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान

  • Share this:

27 जुलै

आशिया खंडातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2011 चे रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाले आहेत. हरिष हांडे आणि नीलम मिश्रा या दोघा भारतीयांना हा पुरस्कार मिळाला. नोबेलनंतर आशियाचा हा प्रतिष्ठीत पुरस्कार समजला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सहा जणांना हा पुरस्कार मिळाला. विजेत्यांना प्रमाणपत्र, एक मेडल आणि रोख बक्षीस दिलं जाईल. 31 ऑगस्ट रोजी फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये पुरस्कार वितरण सोहळा होईल.

फिलीपाईन्सचे लोकप्रिय अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो. त्यांच्या 1957 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. यावेळचे मॅगसेसे पुरस्कार विजेते हरिश हांडे यांनी सौरऊर्जेच्या तंत्रज्ञानात मोलाचं योगदान दिलंय. तर नीलिमा मिश्रा यांनी बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महिलांसाठी मोठं काम केलं. यापूर्वी आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, मदर तेरेसा, अरुण शौरी, टी. एन. सेशन आणि किरण बेदी यांना हा पुरस्कार मिळाला होता.

नीलम मिश्रा यांच्याबद्दल

घरातल्या वापरात नसलेल्या कपड्यांची गोधडी हा आपल्याकडील पारंपरिक प्रकार. याच पारंपरिक कलेला रोजगाराची जोड दिली भगिनी निवेदता बचतगटाने. त्यामुळे बहादरपूरच्या या महिला वर्षाचे बाराही महिने बिझी असतात.

बचतगटातल्या महिलांना खरं पाठबळ मिळाले ते ऑस्ट्रेलियाच्या ऍनी गॉडफ्रे यांचं. ऍनीनं या गोधडीला परदेशात मार्केट उपलब्ध करुन दिलं. आणि गेल्या 7 वर्षापासून कष्टाची ही गोधडी आता जगातील 7 देशांमधे पोहोचली. आज 1800 बचतगटांच्या हा समुहात 16 हजारच्या आसपास महिला काम करतात. अगदी 16 वर्षांपासून ते सत्तरी ओलांडलेल्या. त्यांच्या हॅण्डमेड गोधड्या दर वर्षाला एक नवा देश ओलांडत आहे.

हरिश हांडेंची कारकीर्द

- जन्म 1967, बंगळुरू- अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून एनर्जी इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्सची पदवी - रुरल इलेक्ट्रिफिकेशन या विषयात पीएचडी - सेल्को इंडिया या सामाजिक संस्थेचे सहसंस्थापक - ग्रामीण भागात तंत्रज्ञनाच्या मदतीने गरिबी दूर करण्याचे कार्य- बंगळुरूमध्ये हेडक्वार्टर, कर्नाटक आणि गुजरातमध्ये 25 शाखा - ग्रामीण भागातल्या जवळपास 1 लाख 20 हजार घरांमध्ये सौर ऊर्जेची यंत्रणा बसवली - आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2011 02:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...