राम प्रधान समितीच्या अहवालावर चर्चा होणार

24 जुलैउद्यापासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे. अधिवेशनासाठी सरकारही सज्ज झालं आहे. आयबीएन लोकमतच्या बातमीची दखल घेत राम प्रधान समितीच्या अहवालावर अधिवेशनात सविस्तर चर्चा केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिवेशातील विशेष मुद्द्याची माहिती दिली. मुंबईत 13 जुलैल्या झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांने मुंबापुरी पुन्हा हादरली. या स्फोटात 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी एटीएस,मुंबई पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे. मात्र एटीएसच्या हाती संशियतांच्या शिवाय कोणताही पुरावा हाती लागला नाही. 26/11 च्या हल्ल्यानंतर राम प्रधान चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. राम प्रधान यांनी मागील वर्षीच चौकशीचा अहवाल ही सादर केला. पण एक वर्ष उलटून ही सरकारने प्रधान यांच्याशी अहवालाबद्दल कोणतीही चर्चा केली नाही. अशी खंत खुद्द राम प्रधान यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. तसेच पुणे, मुंबई सारख्या शहरात दहशतवादी हल्ले करू शकतात अशी भीती आधीच व्यक्त केली होती. आपली सुरक्षा यंत्रणेत मुलभूत बद्दल करण्याची गरज आहे असं मत ही राम प्रधान यांनी व्यक्त केलं होतं. 13 जुलैला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा प्रश्नावर विरोधक सरकारला कोंडीत पाडण्याचा प्रयत्न करतील. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राम प्रधान यांच्या अहवालावर चर्चा केली जाईल. तसेच विरोधकांच्या उपाय योजनेचा विचार केला जाईल असं स्पष्ट केलं आहे. त्याच बरोबर गेली अनेक वर्षे खोळंबलेलं जादूटोणा विरोधी विधेयकही अधिवेशनात मांडू असं आश्वासन ही मुख्यमंत्र्यांनी दिलं. या विधेयकाबाबत असलेले सर्व गैरसमज दूर करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. तर वारकर्‍यांचे असलेले गैरसमज दूर करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे या अधिवेशनात तरी हे विधेयक मंजूर होईल अशी आशा आहे.इतर बातम्या सुरक्षा यंत्रणेत मूलभूत बदल करण्याची गरज - राम प्रधान राम प्रधान यांच्याशी गरज पडल्यास चर्चा - उमेशचंद्र सरंगी राम प्रधान समितीच्या अहवालावर वर्षभरात समितीची बैठक नाही

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2011 05:00 PM IST

राम प्रधान समितीच्या अहवालावर चर्चा होणार

24 जुलै

उद्यापासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे. अधिवेशनासाठी सरकारही सज्ज झालं आहे. आयबीएन लोकमतच्या बातमीची दखल घेत राम प्रधान समितीच्या अहवालावर अधिवेशनात सविस्तर चर्चा केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिवेशातील विशेष मुद्द्याची माहिती दिली.

मुंबईत 13 जुलैल्या झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांने मुंबापुरी पुन्हा हादरली. या स्फोटात 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी एटीएस,मुंबई पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे. मात्र एटीएसच्या हाती संशियतांच्या शिवाय कोणताही पुरावा हाती लागला नाही. 26/11 च्या हल्ल्यानंतर राम प्रधान चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. राम प्रधान यांनी मागील वर्षीच चौकशीचा अहवाल ही सादर केला.

पण एक वर्ष उलटून ही सरकारने प्रधान यांच्याशी अहवालाबद्दल कोणतीही चर्चा केली नाही. अशी खंत खुद्द राम प्रधान यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. तसेच पुणे, मुंबई सारख्या शहरात दहशतवादी हल्ले करू शकतात अशी भीती आधीच व्यक्त केली होती. आपली सुरक्षा यंत्रणेत मुलभूत बद्दल करण्याची गरज आहे असं मत ही राम प्रधान यांनी व्यक्त केलं होतं.

13 जुलैला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा प्रश्नावर विरोधक सरकारला कोंडीत पाडण्याचा प्रयत्न करतील. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राम प्रधान यांच्या अहवालावर चर्चा केली जाईल. तसेच विरोधकांच्या उपाय योजनेचा विचार केला जाईल असं स्पष्ट केलं आहे.

त्याच बरोबर गेली अनेक वर्षे खोळंबलेलं जादूटोणा विरोधी विधेयकही अधिवेशनात मांडू असं आश्वासन ही मुख्यमंत्र्यांनी दिलं. या विधेयकाबाबत असलेले सर्व गैरसमज दूर करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. तर वारकर्‍यांचे असलेले गैरसमज दूर करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे या अधिवेशनात तरी हे विधेयक मंजूर होईल अशी आशा आहे.

इतर बातम्या

सुरक्षा यंत्रणेत मूलभूत बदल करण्याची गरज - राम प्रधान राम प्रधान यांच्याशी गरज पडल्यास चर्चा - उमेशचंद्र सरंगी

राम प्रधान समितीच्या अहवालावर वर्षभरात समितीची बैठक नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2011 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...