News18 Lokmat

हॅपी बर्थ डे खड्डेदादा !

24 जुलैपावसाळा आणि खड्डे यांचं नात दरवर्षीचेच. पण याला जबाबदार आहे निकृष्ट बांधकाम यामुळे राज्यभरात खड्‌ड्यांचे साम्राज्य पसरते आणि जनता खड्‌ड्यात म्हणण्याची नामुष्की येते. नाशिकच्या येवल्यात रस्त्यांची अशी अवस्था झाली. शहरातील जवळपास सर्वच ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनाही त्रास होत आहे. वारंवार तक्रार करुनही पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्षचं केलं. त्यामुळे मनसेने आज आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी चक्क खड्‌ड्यांचा वाढदिवस साजरा केला. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापण्यात आला. येवला हा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा मतदार संघ आहे. त्यांच्याच मतदार संघातल्या रस्त्यांची अशी दुरवस्था झाल्याने राज्यात नवीन रस्ते तयार करण्याचा काय उपयोग असाचं प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2011 03:58 PM IST

हॅपी बर्थ डे खड्डेदादा !

24 जुलैपावसाळा आणि खड्डे यांचं नात दरवर्षीचेच. पण याला जबाबदार आहे निकृष्ट बांधकाम यामुळे राज्यभरात खड्‌ड्यांचे साम्राज्य पसरते आणि जनता खड्‌ड्यात म्हणण्याची नामुष्की येते. नाशिकच्या येवल्यात रस्त्यांची अशी अवस्था झाली. शहरातील जवळपास सर्वच ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनाही त्रास होत आहे.

वारंवार तक्रार करुनही पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्षचं केलं. त्यामुळे मनसेने आज आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी चक्क खड्‌ड्यांचा वाढदिवस साजरा केला. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापण्यात आला. येवला हा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा मतदार संघ आहे. त्यांच्याच मतदार संघातल्या रस्त्यांची अशी दुरवस्था झाल्याने राज्यात नवीन रस्ते तयार करण्याचा काय उपयोग असाचं प्रश्न नागरिक विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2011 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...