दहशतवादाविरोधात सरकारचे धोरण मवाळ - अडवाणी

14 जुलैभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज बॉम्बस्फोटाच्या तिन्ही ठिकाणांना भेट दिली. जे. जे. हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली. मुंबईतील हे बॉम्बस्फोट म्हणजे गुप्तचर संस्थांच अपयश नाही सरकारची धोरणंच अपयशी असल्याचे अडवाणी म्हणाले. दहशतवादाविरोधात सरकारचे धोरण मवाळ असल्याचा आरोप त्यांनी केला. दहशतवादाला पाठिंबा देणं बंद केल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नको, असंही अडवाणी म्हणाले आहे. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी स्फोटाच्या ठिकाणांना भेट दिली आणि जे. जे. हॉस्पिटलमधल्या जखमींची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. दहशतवादी हल्ल्यांबद्दल त्यांनी सरकारच्या धोरणांना जबाबदार धरलं.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2011 04:49 PM IST

दहशतवादाविरोधात सरकारचे धोरण मवाळ - अडवाणी

14 जुलै

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज बॉम्बस्फोटाच्या तिन्ही ठिकाणांना भेट दिली. जे. जे. हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली. मुंबईतील हे बॉम्बस्फोट म्हणजे गुप्तचर संस्थांच अपयश नाही सरकारची धोरणंच अपयशी असल्याचे अडवाणी म्हणाले. दहशतवादाविरोधात सरकारचे धोरण मवाळ असल्याचा आरोप त्यांनी केला. दहशतवादाला पाठिंबा देणं बंद केल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नको, असंही अडवाणी म्हणाले आहे. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी स्फोटाच्या ठिकाणांना भेट दिली आणि जे. जे. हॉस्पिटलमधल्या जखमींची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. दहशतवादी हल्ल्यांबद्दल त्यांनी सरकारच्या धोरणांना जबाबदार धरलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 14, 2011 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...