वसई-विरार शहराला घाणीचा विळाखा ; पालिकेचे दुर्लक्ष

03 जुलै वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. लोकांच्या दारात चिखल आणि कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन, ताडपाडा, विकास नगर, बावशेतपाडा, लशावीत, चैाधरी कंपाऊंड तसेच जय अंम्बे वेल्फेअर सोसायटी या भागात नालेसफाई झाली नसून इथल्या गटारात गाळ अजूनही तसाचं आहे. गटारातून पाणी रस्त्यावर आल्याने या परिसरात चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. पिण्याच्या हात पंपालासुद्धा घाणीने वेढलं आहे. येथील लोकांना घाणीबरोबरचं अपघातांचा देखील सामना करावा लागत आहे. आणि याकडे नगरसेवक तसेच महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा येथील रहिवाशांनी केला. मात्र, बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी सफाई पूर्ण झाल्याचा दावा केला आहे

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2011 11:23 AM IST

वसई-विरार शहराला घाणीचा विळाखा ; पालिकेचे दुर्लक्ष

03 जुलै

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. लोकांच्या दारात चिखल आणि कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन, ताडपाडा, विकास नगर, बावशेतपाडा, लशावीत, चैाधरी कंपाऊंड तसेच जय अंम्बे वेल्फेअर सोसायटी या भागात नालेसफाई झाली नसून इथल्या गटारात गाळ अजूनही तसाचं आहे.

गटारातून पाणी रस्त्यावर आल्याने या परिसरात चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. पिण्याच्या हात पंपालासुद्धा घाणीने वेढलं आहे. येथील लोकांना घाणीबरोबरचं अपघातांचा देखील सामना करावा लागत आहे. आणि याकडे नगरसेवक तसेच महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा येथील रहिवाशांनी केला. मात्र, बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी सफाई पूर्ण झाल्याचा दावा केला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2011 11:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...