अखेर ठाकरे सरकारचं खातेवाटपाबद्दल ठरलं, आजच होणार मोठी घोषणा!

अखेर ठाकरे सरकारचं खातेवाटपाबद्दल ठरलं, आजच होणार मोठी घोषणा!

अखेर 13 दिवसांनंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील खातेवाटपाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकासआघाडी सरकार स्थापन केलं. अखेर 13 दिवसांनंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील खातेवाटपाबद्दल मुहूर्त मिळाला आहे. आज रात्री 10 वाजेपर्यंत खातेवाटपाची यादी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

28 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. तर सेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी शपथ घेतली.

शपथविधी पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी  उद्धव ठाकरे  यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभारही हाती घेतला. मात्र, 13 दिवस उलटूनही मंत्र्यांना खातेवाटप झालं नाही. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

अखेर आज उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

कुणाला मिळणार खाते?

राष्ट्रवादी

 जयंत पाटील -

छगन भुजबळ -

काँग्रेस

बाळासाहेब थोरात -

 नितीन राऊत -

शिवसेना

एकनाथ शिंदे

सुभाष देसाई

शरद पवारांनी केली होती सुचना

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन 13 दिवस झाले मात्र अजुनही खातेवाटप जाहीर झालं नव्हतं. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचं बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली. मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये ही चर्चा झाली. या चर्चेत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि अजित पवार सहभागी झाले तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी, खातेवाटपामध्ये फार दिरंगाई नको, खातेवाटप लवकर जाहीर करावे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली होती.

First published: December 10, 2019, 7:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading