नवजात मुलगी शेतात फेकून दिली

नवजात मुलगी शेतात फेकून दिली

25 जूनमागिल काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात स्त्री अर्भक सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील 77 सोनोग्राफी सेंटर सील केले आहे. मात्र 21 शतकाकडे झेप घेणार्‍या महाराष्ट्रात या विचारांना कधी सील करता येईल हा गंभीर प्रश्न आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शेतात एका नवजात मुलगी शेतात फेकून दिल्याची घटना घडली आहे.या नवजात मुलीला पृथ्वीतलावर येऊन एकच दिवस उलटला तोच जन्मदात्याने तीला पिंपरी-चिंचवड परिसरातल्या रुपीनगरमध्ये शेतात फेकून दिलं. राम मंदिराच्या मागच्या शेतात ही नवजात मुलगी बेवारसपणे पडलेलं होतं. याच भागात राहणारे दिनकर कृष्णा भालेकर सकाळी 6 वाजता मंदिरापासून जात असताना ही बाब लक्षात आली. त्या नंतर त्यांनी लगेचच जवळच्या पोलिसांना कळवलं. परंतु पोलिसांना घटनास्थळी यायला तब्बल दोन तास उशीर केला. त्यानंतर पंचनामा करुन हे नवजात बाळ ससून हॉस्पिटलमधल्या संगोपन केद्रात दाखल केलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास देहु रोड पोलीस करत आहेत.

  • Share this:

25 जून

मागिल काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात स्त्री अर्भक सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील 77 सोनोग्राफी सेंटर सील केले आहे. मात्र 21 शतकाकडे झेप घेणार्‍या महाराष्ट्रात या विचारांना कधी सील करता येईल हा गंभीर प्रश्न आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शेतात एका नवजात मुलगी शेतात फेकून दिल्याची घटना घडली आहे.

या नवजात मुलीला पृथ्वीतलावर येऊन एकच दिवस उलटला तोच जन्मदात्याने तीला पिंपरी-चिंचवड परिसरातल्या रुपीनगरमध्ये शेतात फेकून दिलं. राम मंदिराच्या मागच्या शेतात ही नवजात मुलगी बेवारसपणे पडलेलं होतं. याच भागात राहणारे दिनकर कृष्णा भालेकर सकाळी 6 वाजता मंदिरापासून जात असताना ही बाब लक्षात आली. त्या नंतर त्यांनी लगेचच जवळच्या पोलिसांना कळवलं. परंतु पोलिसांना घटनास्थळी यायला तब्बल दोन तास उशीर केला. त्यानंतर पंचनामा करुन हे नवजात बाळ ससून हॉस्पिटलमधल्या संगोपन केद्रात दाखल केलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास देहु रोड पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2011 02:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading