महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा हायव्होल्टेज ड्रामा, शरद पवारांनी केले धडाधड ट्वीट्स

महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा हायव्होल्टेज ड्रामा, शरद पवारांनी केले धडाधड ट्वीट्स

महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचा नवा अंक सुरू. सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून ट्विटची मालिका.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर: महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचा नवा अंक सुरू झाला आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन केल्याच्या चर्चा होत असतानाच नव्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटची मालिका सुरू केली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच 360 डिग्रीमध्ये राजकारणात बदल व्हावा तसा भूकंपच झाला आहे नवीन समीकरण समोर आलं. या समीकरणानंतर आरोप प्रत्यारोपांच्या मालिका सुरू झाल्या आहेत. शरद पवारांनी ट्विट करून सत्ता संघर्षाच्या नव्या समीकरणावर टीका केली आहे.

शरद पवारांच्या समर्थनार्थ बारामतीमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. तर अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे कुटुंबात आणि पक्षातील वाद सर्वांसमोर आल्याची चर्चा होत आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. अजित पवारांवर पक्षाने तडकाफडकी कारवाई केली आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीतून एक गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या शपथविधीला अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे अनेक आमदार पुन्हा पक्षाकडे परतले आहेत. या आमदारांनी बंडखोरी करण्यास नकार दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही, असा दावा शरद पवार यांनी यावेळी केला.

अजित पवारांचा निर्णय हा पक्षाविरोधात आहे. त्यांनी शिस्तभंग केला आहे. अजित पवारांवरील कारवाईचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल, असे शरद पवार यांनी सांगितले. अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांची यादी आधीच घेऊन ठेवली होती.ही यादी राज्यपालांसमोर सादर करण्यात आली. राज्यपालांची दिशाभूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अजित पवारांच्या सभेला कोणीही हजर राहणार नाही. जे जातील त्यांचे सदस्यत्व संकटात येईल, असा इशाराही शरद पवारांनी दिला. मात्र, गैरसमजातून कोणी गेलं असेल तर कारवाई नाही, असे पवारांनी सांगितले.

सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांना भोपाळला तातडीनं हलवण्यात येणार आहे. भाजपकडे आवश्यक ते बहुमत सिद्ध करता येणार नाही असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सत्तासंघर्षाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली आहे.अजित पवार आणि भाजपचे आमदार बहुमत सिद्ध करू शकतील का?याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. तर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. पवारांनी या हायव्हॉल्टेज ड्रामावर सलग ट्विटची मालिका सुरु केली आहे. पवारांच्या प्रत्येक ट्विटला रिट्विट करण्याची संख्या अधिक आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार सोशल मीडियावर आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 23, 2019, 3:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading