मी भाजपमध्येच राहणार - मुंडे

मी भाजपमध्येच राहणार - मुंडे

22 जूनगेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या नाराजी नाट्यावर आज पडदा पडला. सर्व पर्याय खुले ठेवत दिल्लीत पोहोचलेल्या मुंडेंनी अखेर भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. भाजपच्या नेत्या स्वराज यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मुंडेंनी बंडाची तलवार म्यान केली. पण मुंडेंच्या मागण्या मान्य होणार का, या प्रश्नाचा उलगडा मात्र झाला नाही....जाणार मुंडे कुणीकडे या चर्चेवर अखेर खुद्द गोपीनाथ मुंडे यांनीच पडदा टाकला. सुषमा स्वराज यांची शिष्टाई कामी आली. आणि मी भाजपमध्येच आहे, आणि भाजपमध्येच राहणार, असं स्पष्ट करत मुंडेंनी आपल्याबद्दलच्या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहेत त्या जाणूनबुजून पसरवल्या जातायत असा आरोप केला.सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत मंगळवारी रात्री दिल्लीत पोचलेल्या मुंडे यांनी बुधवारी दुपारपर्यंत सर्वांची उत्सुकता ताणून धरली होती. दुपारी तीन वाजता ते सुषमा स्वराज यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोचले. जवळपास अर्धा पाऊण तास झालेल्या चर्चेनंतर मुंडेंनी सगळ्यांची उत्सुकता एकदाची संपवली. पण नाराजी कायम असून चर्चा सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.मुंडेंना काँग्रेसकडून ऑफर आहे, आणि ते कोणत्याही क्षणी काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा करणार असंच वातावरण गेल्या दोन दिवसांपासून होतं. मंगळवारी रात्री मुंडे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही दिल्लीत दाखल झाल्याने चर्चांना वेग आला होता. या चर्चांमुळे मुंडेंची मनधरणी करण्याची गरजच काय अशी कठोर भूमिका भाजपश्रेष्ठींनीही घेतली होती. त्यामुळे लक्ष होतं ते सुषमा स्वराज आणि मुंडे यांच्या भेटीकडे. या भेटीनंतर प्रकणावर पडदा पडला आणि मुंडे यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न पक्षातूनच होत असल्याचा आरोप करत सुषमांनी पक्षातल्या मतभेदांवर शिक्कामोर्तब केलं.थेट पक्षाध्यक्ष गडकरींशी दंड थोपटलेल्या मुंडेंची समजूत काढण्यासाठी सुषमांनी पुढाकार घेतला. तूर्तास तरी त्यात त्यांना यश आल्याचं दिसतंय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंडेंनी निर्माण केलेलं राजकीय वादळ सध्यातरी शमलंय. पण ज्या कारणांमुळे मुंडे नाराज होते. त्याचं काय हा प्रश्न मात्र अजून संपलेला नाही. भाजपमध्येच राहणार असं मुंडेंनी स्पष्ट केलं असलं तरी, त्यांची नाराजी दूर होणार का हा खरा प्रश्न आहे.दरम्यान, मुंडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुषमा स्वराज भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींना भेटल्या. आणि मुंडेंशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. मुंडेंची नाराजी अजून दूर झालेली नाही. त्यामुळे 27 आणि 28 जूनला दिल्लीत होणार्‍या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुंडेंच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. तर नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याशी फोनवरून बातचीत केली. लवकरच दोन्ही नेते मुंबईत भेटणार आहेत.दरम्यान, मी किंवा अहमद पटेल यांनी गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतलेली नाही, ही केवळ अफवा आहे. असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. पण, मुंडेंच्या संपर्कात काँग्रेस आहे का? या प्रश्नावर उत्तर देण्याचं मात्र त्यांनी टाळलं.

  • Share this:

22 जून

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या नाराजी नाट्यावर आज पडदा पडला. सर्व पर्याय खुले ठेवत दिल्लीत पोहोचलेल्या मुंडेंनी अखेर भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. भाजपच्या नेत्या स्वराज यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मुंडेंनी बंडाची तलवार म्यान केली. पण मुंडेंच्या मागण्या मान्य होणार का, या प्रश्नाचा उलगडा मात्र झाला नाही.

...जाणार मुंडे कुणीकडे या चर्चेवर अखेर खुद्द गोपीनाथ मुंडे यांनीच पडदा टाकला. सुषमा स्वराज यांची शिष्टाई कामी आली. आणि मी भाजपमध्येच आहे, आणि भाजपमध्येच राहणार, असं स्पष्ट करत मुंडेंनी आपल्याबद्दलच्या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहेत त्या जाणूनबुजून पसरवल्या जातायत असा आरोप केला.

सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत मंगळवारी रात्री दिल्लीत पोचलेल्या मुंडे यांनी बुधवारी दुपारपर्यंत सर्वांची उत्सुकता ताणून धरली होती. दुपारी तीन वाजता ते सुषमा स्वराज यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोचले. जवळपास अर्धा पाऊण तास झालेल्या चर्चेनंतर मुंडेंनी सगळ्यांची उत्सुकता एकदाची संपवली. पण नाराजी कायम असून चर्चा सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुंडेंना काँग्रेसकडून ऑफर आहे, आणि ते कोणत्याही क्षणी काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा करणार असंच वातावरण गेल्या दोन दिवसांपासून होतं. मंगळवारी रात्री मुंडे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही दिल्लीत दाखल झाल्याने चर्चांना वेग आला होता.

या चर्चांमुळे मुंडेंची मनधरणी करण्याची गरजच काय अशी कठोर भूमिका भाजपश्रेष्ठींनीही घेतली होती. त्यामुळे लक्ष होतं ते सुषमा स्वराज आणि मुंडे यांच्या भेटीकडे. या भेटीनंतर प्रकणावर पडदा पडला आणि मुंडे यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न पक्षातूनच होत असल्याचा आरोप करत सुषमांनी पक्षातल्या मतभेदांवर शिक्कामोर्तब केलं.

थेट पक्षाध्यक्ष गडकरींशी दंड थोपटलेल्या मुंडेंची समजूत काढण्यासाठी सुषमांनी पुढाकार घेतला. तूर्तास तरी त्यात त्यांना यश आल्याचं दिसतंय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंडेंनी निर्माण केलेलं राजकीय वादळ सध्यातरी शमलंय. पण ज्या कारणांमुळे मुंडे नाराज होते. त्याचं काय हा प्रश्न मात्र अजून संपलेला नाही. भाजपमध्येच राहणार असं मुंडेंनी स्पष्ट केलं असलं तरी, त्यांची नाराजी दूर होणार का हा खरा प्रश्न आहे.

दरम्यान, मुंडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुषमा स्वराज भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींना भेटल्या. आणि मुंडेंशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. मुंडेंची नाराजी अजून दूर झालेली नाही. त्यामुळे 27 आणि 28 जूनला दिल्लीत होणार्‍या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुंडेंच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. तर नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याशी फोनवरून बातचीत केली. लवकरच दोन्ही नेते मुंबईत भेटणार आहेत.

दरम्यान, मी किंवा अहमद पटेल यांनी गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतलेली नाही, ही केवळ अफवा आहे. असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. पण, मुंडेंच्या संपर्कात काँग्रेस आहे का? या प्रश्नावर उत्तर देण्याचं मात्र त्यांनी टाळलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2011 10:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...