समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुटलेले जहाज अडचणीत

19 जूनसोमालियाच्या समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुटलेल्या सुएझ जहाजाचे शुक्लकाष्ठ अजूनही संपलेलं नाही. ओमानकडे जाणार्‍या या जहाजाचे इंधन संपत आलं आहे. त्यामुळे ओमानपर्यंतही ते पोहचू शकत नाही. शिवाय समुद्रही खवळला आहे. त्यामुळेही अनेक अडचणी येत आहे. जहाजाच्या मालकाशीही संपर्क होऊ शकत नाही. जहाजाला वाचवण्यासाठी येणारी बोट काल रात्री येणं अपेक्षित होतं. पण ती बोटही अजून पोचलेली नाही. त्यामुळे आता हे जहाज ओमान ऐवजी दुसर्‍या बंदरावर नेण्याचा निर्णय जहाज्यावरच्या खलाशांनी घेतला. या जहाजावर सहा भारतीय खलाशी आहेत. तब्बल 20 लाख डॉलर्सची खंडणी दिल्यानंतर सोमालिया चाच्यांनी या जहाजाची सुटका केली होती. इजिप्तमधील जहाजाच्या मालकाने ही खंडणी दिली होती.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2011 10:39 AM IST

समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुटलेले जहाज अडचणीत

19 जून

सोमालियाच्या समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुटलेल्या सुएझ जहाजाचे शुक्लकाष्ठ अजूनही संपलेलं नाही. ओमानकडे जाणार्‍या या जहाजाचे इंधन संपत आलं आहे. त्यामुळे ओमानपर्यंतही ते पोहचू शकत नाही. शिवाय समुद्रही खवळला आहे. त्यामुळेही अनेक अडचणी येत आहे.

जहाजाच्या मालकाशीही संपर्क होऊ शकत नाही. जहाजाला वाचवण्यासाठी येणारी बोट काल रात्री येणं अपेक्षित होतं. पण ती बोटही अजून पोचलेली नाही. त्यामुळे आता हे जहाज ओमान ऐवजी दुसर्‍या बंदरावर नेण्याचा निर्णय जहाज्यावरच्या खलाशांनी घेतला.

या जहाजावर सहा भारतीय खलाशी आहेत. तब्बल 20 लाख डॉलर्सची खंडणी दिल्यानंतर सोमालिया चाच्यांनी या जहाजाची सुटका केली होती. इजिप्तमधील जहाजाच्या मालकाने ही खंडणी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2011 10:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...