आंबोली घाटात दरड कोसळल्यामुळे 8 दिवस वाहतूक बंद

आंबोली घाटात दरड कोसळल्यामुळे 8 दिवस वाहतूक बंद

12 जूनआंबोली घाटात शनिवारी मध्यरात्री दीड वाजता दरड कोसळली. त्यामुळे सावंतवाडीकडून कोल्हापूर आणि बेळगावकडे जाणारा मार्ग ठप्प झाला आहे. गेल्यावर्षी याच ठिकाणी दरड कोसळली होती. प्रशासनाने संरक्षक भींतही बांधली होती. पण पुन्हा एकदा पावसाच्या सुरवातीलाच आंबोली घाट बंद झाला आहे. दरड एवढी मोठी आहे की ती हटवायला किमान 8 ते 10 दिवस तरी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. सध्या घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी दोन जेसीबीच्या साहायाने दरड बाजूला करण्याचं काम करत आहे. मात्र हे काम 7 दिवसात पुर्ण करावे अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. धबधब्याच्या ठिकाणी मात्र बेळगाव आणि कोल्हापूरकडून येणार्‍या पर्यटकांना या दरडीचा अडथळा होणार नाही.

  • Share this:

12 जून

आंबोली घाटात शनिवारी मध्यरात्री दीड वाजता दरड कोसळली. त्यामुळे सावंतवाडीकडून कोल्हापूर आणि बेळगावकडे जाणारा मार्ग ठप्प झाला आहे. गेल्यावर्षी याच ठिकाणी दरड कोसळली होती. प्रशासनाने संरक्षक भींतही बांधली होती.

पण पुन्हा एकदा पावसाच्या सुरवातीलाच आंबोली घाट बंद झाला आहे. दरड एवढी मोठी आहे की ती हटवायला किमान 8 ते 10 दिवस तरी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येतंय.

सध्या घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी दोन जेसीबीच्या साहायाने दरड बाजूला करण्याचं काम करत आहे. मात्र हे काम 7 दिवसात पुर्ण करावे अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. धबधब्याच्या ठिकाणी मात्र बेळगाव आणि कोल्हापूरकडून येणार्‍या पर्यटकांना या दरडीचा अडथळा होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2011 04:35 PM IST

ताज्या बातम्या