मनसेचे आ. रमेश वांजळे यांचे निधन

10 जूनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील खडकवासचे आमदार रमेश वांजळे यांचं निधन झालं. ह्रदयविकाराचा छटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. ते 45 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. काही दिवसांपासून वांजळे यांना उच्चरक्तदाबाचा त्रास होत होता. संध्याकाळी साठे आठच्या सुमारास जहागिर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तब्बल एक तास त्यांच्यावर उपचार सुरू होता. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. पण काळ त्यांना वाचवू शकला नाही. आणि नऊ वाजून पन्नास मिनिटांनी डॉक्टारांनी त्यांना मृत्यू घोषित केलं. गोल्ड मॅन अशी ख्याती रमेश वांजळे यांची होती. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून मनसेचं खात उघडणारे पहिले आमदार होते. आमदार पदाच्या शपथविधी सोहळ्यात अबू आझमी यांनी मराठीतून शपथविधी घ्यावी अशी मागणी केली होती. यावेळी वांजळे यांनी अबू आझमी यांचा माईक हिसकावून घेतला होता. या प्रकरणी मनसेचे चार निलंबित केलेल्या आमदारांमध्ये वांजळे यांचं ही नाव होतं. रमेश वांजळे 'मनसे' चे आमदार- पुण्याच्या खडकवासल्याचे आमदार- 'मनसे' चे पुण्याचे पहिले आमदार- गोल्डमॅन म्हणूनही ओळख- 2002 - 2007 हवेली पंचायत समितीचे सदस्य- 2002 - 2004 हवेली पंचायत समितीचे उपसभापती- 2009 - काँग्रेसमधून 'मनसे' त प्रवेश - 2009 - विधानसभेत 'मनसे' चे आमदार

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2011 05:53 PM IST

मनसेचे आ. रमेश वांजळे यांचे निधन

10 जून

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील खडकवासचे आमदार रमेश वांजळे यांचं निधन झालं. ह्रदयविकाराचा छटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. ते 45 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. काही दिवसांपासून वांजळे यांना उच्चरक्तदाबाचा त्रास होत होता. संध्याकाळी साठे आठच्या सुमारास जहागिर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तब्बल एक तास त्यांच्यावर उपचार सुरू होता. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. पण काळ त्यांना वाचवू शकला नाही. आणि नऊ वाजून पन्नास मिनिटांनी डॉक्टारांनी त्यांना मृत्यू घोषित केलं.

गोल्ड मॅन अशी ख्याती रमेश वांजळे यांची होती. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून मनसेचं खात उघडणारे पहिले आमदार होते. आमदार पदाच्या शपथविधी सोहळ्यात अबू आझमी यांनी मराठीतून शपथविधी घ्यावी अशी मागणी केली होती. यावेळी वांजळे यांनी अबू आझमी यांचा माईक हिसकावून घेतला होता. या प्रकरणी मनसेचे चार निलंबित केलेल्या आमदारांमध्ये वांजळे यांचं ही नाव होतं.

रमेश वांजळे 'मनसे' चे आमदार

- पुण्याच्या खडकवासल्याचे आमदार- 'मनसे' चे पुण्याचे पहिले आमदार- गोल्डमॅन म्हणूनही ओळख- 2002 - 2007 हवेली पंचायत समितीचे सदस्य- 2002 - 2004 हवेली पंचायत समितीचे उपसभापती- 2009 - काँग्रेसमधून 'मनसे' त प्रवेश - 2009 - विधानसभेत 'मनसे' चे आमदार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2011 05:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...