राज्यात पावसाचा धुमाकूळ 18 बळी

राज्यात पावसाचा धुमाकूळ 18 बळी

10 जूनमराठवाड्यात पावसाच्या आगमनासोबत विजेचं तांंडव सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर नांदेड जिल्ह्यातील धावरी गावात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अचानक आलेल्या पावसाने चार जणांचा बळी घेतला. लोहा तालुक्यात धारावी येथे वीज पडून तिघे जण मृत्यू पावले. त्यामुळे आठवडाभरात वीज पडून मृत्यू पावलेल्याचीं संख्या आता अठरावर पोहचली आहे. आता पर्यंत झालेल्या पावसात मराठवाड्यात वीस बैलांचाही मृत्यू झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली आणि निरवडे गावांना चक्री वादळाचा तडाखा बसला आहे. वादळामुळे झाडं घरांवर कोसळून 16 घरांची पडझड झाली आहे. सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरीही सुमारे 10 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी पहाटे हे वादळ सोनुर्ली आणि निरवडेगावात घुसलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात पावसाला जोर आहे. खेड शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पावसाची संतत धार सुरूच असून खेडच्या ग्रामीण भागाला जोडणार्‍या अनेक रस्त्यांवरची वाहतूक खंडीत झाली आहे. सात अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे हे रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सुरू होणार्‍या शाळांमध्ये पोहोचण्यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीतरची पायपीट करावी लागणार आहे.

  • Share this:

10 जून

मराठवाड्यात पावसाच्या आगमनासोबत विजेचं तांंडव सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर नांदेड जिल्ह्यातील धावरी गावात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अचानक आलेल्या पावसाने चार जणांचा बळी घेतला. लोहा तालुक्यात धारावी येथे वीज पडून तिघे जण मृत्यू पावले. त्यामुळे आठवडाभरात वीज पडून मृत्यू पावलेल्याचीं संख्या आता अठरावर पोहचली आहे. आता पर्यंत झालेल्या पावसात मराठवाड्यात वीस बैलांचाही मृत्यू झाला आहे.

तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली आणि निरवडे गावांना चक्री वादळाचा तडाखा बसला आहे. वादळामुळे झाडं घरांवर कोसळून 16 घरांची पडझड झाली आहे. सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरीही सुमारे 10 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी पहाटे हे वादळ सोनुर्ली आणि निरवडेगावात घुसलं.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात पावसाला जोर आहे. खेड शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पावसाची संतत धार सुरूच असून खेडच्या ग्रामीण भागाला जोडणार्‍या अनेक रस्त्यांवरची वाहतूक खंडीत झाली आहे.

सात अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे हे रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सुरू होणार्‍या शाळांमध्ये पोहोचण्यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीतरची पायपीट करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2011 11:33 AM IST

ताज्या बातम्या