द्रमुक सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता

द्रमुक सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता

09 जून2 जी घोटाळ्याप्रकरणी मुलगी कनिमोळी यांना जामीन मिळत नसल्याने द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी संतापले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार द्रमुक केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे. उद्या द्रमुकची उच्चस्तरीय बैठक होते आहे. या बैठकीत यासंबंधी ठराव होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. वाईट मैत्रीचा शेवट संकटातच होतो असं वक्तव्य करुणानिधी यांनी त्यांच्या वाढदिवशी केलं होतं. त्याचवेळी काँग्रेस आणि द्रमुकमध्ये सारं काही आलबेल नाही हे स्पष्ट झालं होतं. द्रमुकचे एकूण 18 खासदार आहेत. द्रमुकने पाठिंबा काढल्यास राजकीय समीकरणं बदलू शकतात पण सरकार अडचणीत येण्याची शक्यता नाही. यूपीएला समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचा बाहेरून पाठिंबा आहे.

  • Share this:

09 जून

2 जी घोटाळ्याप्रकरणी मुलगी कनिमोळी यांना जामीन मिळत नसल्याने द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी संतापले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार द्रमुक केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे. उद्या द्रमुकची उच्चस्तरीय बैठक होते आहे. या बैठकीत यासंबंधी ठराव होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाईट मैत्रीचा शेवट संकटातच होतो असं वक्तव्य करुणानिधी यांनी त्यांच्या वाढदिवशी केलं होतं. त्याचवेळी काँग्रेस आणि द्रमुकमध्ये सारं काही आलबेल नाही हे स्पष्ट झालं होतं. द्रमुकचे एकूण 18 खासदार आहेत. द्रमुकने पाठिंबा काढल्यास राजकीय समीकरणं बदलू शकतात पण सरकार अडचणीत येण्याची शक्यता नाही. यूपीएला समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचा बाहेरून पाठिंबा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2011 06:05 PM IST

ताज्या बातम्या