नाशिकमध्ये इमारतीत भीषण स्फोट ; 3 जण ठार

नाशिकमध्ये इमारतीत भीषण स्फोट ; 3 जण ठार

08 जूननाशिकमध्ये तारवाला नगरमध्ये आज दुपारी एका निवासी इमारतीमध्ये एक शक्तीशाली स्फोट झाला. सप्तशृंगी अपार्टमेंट असं या इमारतीचं नाव आहे. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण हा स्फोट जिलेटीनचा असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. या स्फोटात आतापर्यंत तीन जनांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झालेत. या स्फोटात इमारतीचा तळमजला आणि पहिला मजला उध्वस्त झाला आहे. इतकंच नाही तर या स्फोटाची तीव्रती इतकी मोठी होती की आजूबाजूच्या काही इमारतींनाही मोठे तडे गेले आहे. पोलीस या स्फोटाच्या कारणांचा अजूनही शोध घेत आहेत. या इमारतीच्या खाली असलेल्या वाहनांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान मुंबई आणि पुणे इथून एटीएसची पथकं नाशिकला रवाना झाली आहे. सुरवातीला हा स्फोट बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण आता मात्र हा स्फोट तळमजल्यावर झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी देत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एका कारमधून संशयित काही सामानाचे बॉक्सेस घेऊन उतरले. त्यानंतर अर्ध्या तासात हा स्फोट झाला. या स्फोटात मृत झालेल्यांमध्ये 2 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. मृतांमध्ये महेंद्र मैंद, रवींद्र विश्वकर्मा, महादेव वर्मा अशी त्यांची नावं आहेत. तळमजल्यावरचे एक रिकामं दुकान मालकाने फटाक्याच्या व्यापाराला भाड्याने दिल्याची शक्यताही आता पुढे येत आहे. या फटाकेवाल्याने आणलेल्या दारुसामानाचा स्फोट झाला का? या शक्यतेचाही पोलीस शोध घेत आहे.दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाचीही पाहणी केली. मुख्यमंत्र्यातर्फे यावेळी मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.तसेच या स्फोटाच्या कारणाविषयी किंवा स्फोटाविषयी कोणत्याही अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास सध्या पोलीस करत आहे. पण या तपासादरम्यान एका गाडीच्या डीकीमध्ये एक सुतळी बॉम्ब सापडला आहे. तर सायबर कॅफेचा मालक शाम गवई ला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्याने फटाक्याचा व्यापारी मोहन गुरूवानीला कच्चा माल ठेवण्यासाठी सायबर कॅफेची खोली भाड्याने दिली होती असं समजतयं. स्फोट आणि तर्क-वितर्क- जिलेटीनच्या कांड्यांचा अवैध साठा कारणीभूत- फटाक्यांच्या दारुमुळे स्फोट?- गाडीतील एलपीजी सिलेंडरमुळे स्फोट?

  • Share this:

08 जून

नाशिकमध्ये तारवाला नगरमध्ये आज दुपारी एका निवासी इमारतीमध्ये एक शक्तीशाली स्फोट झाला. सप्तशृंगी अपार्टमेंट असं या इमारतीचं नाव आहे. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण हा स्फोट जिलेटीनचा असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. या स्फोटात आतापर्यंत तीन जनांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झालेत.

या स्फोटात इमारतीचा तळमजला आणि पहिला मजला उध्वस्त झाला आहे. इतकंच नाही तर या स्फोटाची तीव्रती इतकी मोठी होती की आजूबाजूच्या काही इमारतींनाही मोठे तडे गेले आहे. पोलीस या स्फोटाच्या कारणांचा अजूनही शोध घेत आहेत.

या इमारतीच्या खाली असलेल्या वाहनांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान मुंबई आणि पुणे इथून एटीएसची पथकं नाशिकला रवाना झाली आहे. सुरवातीला हा स्फोट बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण आता मात्र हा स्फोट तळमजल्यावर झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी देत आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार एका कारमधून संशयित काही सामानाचे बॉक्सेस घेऊन उतरले. त्यानंतर अर्ध्या तासात हा स्फोट झाला. या स्फोटात मृत झालेल्यांमध्ये 2 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. मृतांमध्ये महेंद्र मैंद, रवींद्र विश्वकर्मा, महादेव वर्मा अशी त्यांची नावं आहेत.

तळमजल्यावरचे एक रिकामं दुकान मालकाने फटाक्याच्या व्यापाराला भाड्याने दिल्याची शक्यताही आता पुढे येत आहे. या फटाकेवाल्याने आणलेल्या दारुसामानाचा स्फोट झाला का? या शक्यतेचाही पोलीस शोध घेत आहे.

दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाचीही पाहणी केली. मुख्यमंत्र्यातर्फे यावेळी मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.

तसेच या स्फोटाच्या कारणाविषयी किंवा स्फोटाविषयी कोणत्याही अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास सध्या पोलीस करत आहे. पण या तपासादरम्यान एका गाडीच्या डीकीमध्ये एक सुतळी बॉम्ब सापडला आहे. तर सायबर कॅफेचा मालक शाम गवई ला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्याने फटाक्याचा व्यापारी मोहन गुरूवानीला कच्चा माल ठेवण्यासाठी सायबर कॅफेची खोली भाड्याने दिली होती असं समजतयं.

स्फोट आणि तर्क-वितर्क

- जिलेटीनच्या कांड्यांचा अवैध साठा कारणीभूत- फटाक्यांच्या दारुमुळे स्फोट?- गाडीतील एलपीजी सिलेंडरमुळे स्फोट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2011 08:53 AM IST

ताज्या बातम्या