Elec-widget

बाबांसह 10 जणांवर गुन्हा दाखल

बाबांसह 10 जणांवर गुन्हा दाखल

07 जूनबाबा रामदेव यांचं आंदोलन चिरडल्यानंतर आता सरकारने रामदेव यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. बाबा रामदेव आणि त्यांच्या 10 समर्थकांवर दिल्लीतल्या कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची चौकशीही करण्यात येणार आहे. रामदेव बाबांवर लोकांना भडकवण्याचा आरोप ठेवण्यात आलाआहे.योगगुरू ते भावी राजकारणी आणि मोठा व्यावसायिक. बाबा रामदेव यांचा भ्रष्टाचारविरोधी लढाईसोबतच त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख होतेय. आणि त्यासोबतच बाबा रामदेव यांना अधिकाधिक प्रसिद्धी मिळत आहे.पण त्यांच्या या लोकप्रियतेबरोबरच बाबा रामदेव आता सरकारच्या नजरेखाली आले आहे. बाबा रामदेव यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न आता सरकारकडून सुरू होण्याची शक्यता आहे.ब्रॉडकास्टिंग कंपन्यांपासून फूड पार्क्सपर्यंत बाबा रामदेव यांचे जवळपास 200 च्या वर उद्योगधंदे आहेत. ज्यांचा कारभार बाबा रामदेव यांचे विश्वासू सहकारी आचार्य बालकृष्ण आणि मुक्तानंद पाहतात. त्यांच्याकडे आता सरकारनं लक्ष वळवलंय. वेगवेगळे महंतही या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहे.आता बालकृष्णन यांच्या राष्ट्रीयत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ते नेपाळी नागरिक असल्याचा आरोप होत आहे. इतकंच नाही, आता बाबा रामदेव यांना अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागानंही धक्का दिला आहे. रामदेव यांची आयुर्वेदिक उत्पादनं अमेरिकेत विकायला बंदी घालण्यात आली. मंजूर न केलेली किंवा सुरुवातीला यादीत नसलेली उत्पादनं बाबा रामदेव विकत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. तर सध्याचा वाद संपल्यानंतर या मुद्द्याकडे लक्ष देऊ असं भारताच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. बाबांनी जमिनी हडपल्याचे आरोपही आता होत आहे. रामदेव यांच्या पतंजली योगपीठाने शेतकर्‍यांची 2.98 हेक्टर सुपीक जमीन हडपल्याचा आरोपही रुरकीच्या जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या अहवालात केला आहे.सरकारविरोधातील आंदोलन तापवत ठेवण्याची गरज बाबा रामदेव आणि भाजपला आहे. तर काँग्रेसने बाबा रामदेव यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि सरकार बाबा रामदेव यांच्याशी संबंधित वेगवेगळी प्रकरणं उकरून काढण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:

07 जून

बाबा रामदेव यांचं आंदोलन चिरडल्यानंतर आता सरकारने रामदेव यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. बाबा रामदेव आणि त्यांच्या 10 समर्थकांवर दिल्लीतल्या कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची चौकशीही करण्यात येणार आहे. रामदेव बाबांवर लोकांना भडकवण्याचा आरोप ठेवण्यात आलाआहे.

योगगुरू ते भावी राजकारणी आणि मोठा व्यावसायिक. बाबा रामदेव यांचा भ्रष्टाचारविरोधी लढाईसोबतच त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख होतेय. आणि त्यासोबतच बाबा रामदेव यांना अधिकाधिक प्रसिद्धी मिळत आहे.

पण त्यांच्या या लोकप्रियतेबरोबरच बाबा रामदेव आता सरकारच्या नजरेखाली आले आहे. बाबा रामदेव यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न आता सरकारकडून सुरू होण्याची शक्यता आहे.

ब्रॉडकास्टिंग कंपन्यांपासून फूड पार्क्सपर्यंत बाबा रामदेव यांचे जवळपास 200 च्या वर उद्योगधंदे आहेत. ज्यांचा कारभार बाबा रामदेव यांचे विश्वासू सहकारी आचार्य बालकृष्ण आणि मुक्तानंद पाहतात. त्यांच्याकडे आता सरकारनं लक्ष वळवलंय. वेगवेगळे महंतही या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहे.

आता बालकृष्णन यांच्या राष्ट्रीयत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ते नेपाळी नागरिक असल्याचा आरोप होत आहे. इतकंच नाही, आता बाबा रामदेव यांना अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागानंही धक्का दिला आहे.

रामदेव यांची आयुर्वेदिक उत्पादनं अमेरिकेत विकायला बंदी घालण्यात आली. मंजूर न केलेली किंवा सुरुवातीला यादीत नसलेली उत्पादनं बाबा रामदेव विकत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. तर सध्याचा वाद संपल्यानंतर या मुद्द्याकडे लक्ष देऊ असं भारताच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

बाबांनी जमिनी हडपल्याचे आरोपही आता होत आहे. रामदेव यांच्या पतंजली योगपीठाने शेतकर्‍यांची 2.98 हेक्टर सुपीक जमीन हडपल्याचा आरोपही रुरकीच्या जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या अहवालात केला आहे.

सरकारविरोधातील आंदोलन तापवत ठेवण्याची गरज बाबा रामदेव आणि भाजपला आहे. तर काँग्रेसने बाबा रामदेव यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि सरकार बाबा रामदेव यांच्याशी संबंधित वेगवेगळी प्रकरणं उकरून काढण्याच्या तयारीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2011 11:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...