30 सप्टेंबरच्या आत 'असं' लिंक करा पॅन आणि आधार कार्ड, नाही तर होईल मोठं नुकसान

30 सप्टेंबरच्या आत 'असं' लिंक करा पॅन आणि आधार कार्ड, नाही तर होईल मोठं नुकसान

Pan Card, Aadhar Card - पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता खूपच कमी अवधी राहिलाय. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : तुमच्या काही गोष्टी लक्षात येतायत का?  30 सप्टेंबर जवळ येत चाललंय. त्याआधी तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्डाशी जोडलं नाहीत तर तुमचं पॅन कार्ड बाद होऊ शकतं. इकाॅनाॅमिक टाइम्समध्ये छापलेल्या बातमीनुसार तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक नसेल तर पॅन कार्ड 1 ऑक्टोबरपासून ते बाद होऊ शकतं. जुलैमध्ये बजेटच्या वेळीच पॅन-आधार लिंक करण्याच्या नियमात बदल करण्याची घोषणा केली गेली होती. CBDT नं पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर घोषित केली होती.

Invalid म्हणजे काय?

Invalid चा अर्थ तुमच्याकडे पॅन कार्ड नाहीच आहे. Inoperative चा अर्थ असा की, जोपर्यंत तुम्ही आधार कार्डाशी लिंक करत नाहीत, तोपर्यंत तुम्ही तुमचं पॅन कार्ड वापरू शकत नाही. पण या दोन शब्दांचा अर्थ सांगितलेला नाही.

1 ऑक्टोबरपासून SBI च्या खात्यात पैसे जमा करण्याचे आणि काढण्याचे बदलले नियम

प्लॅस्टिक बंदीनंतर 1 लाख रुपये गुंतवा आणि सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल भरपूर कमाई

कसं करायचं लिंक?

यासाठी तुम्ही ई-फाइलिंग वेबसाइट (www.incometaxindiaefiling.gov.in) या आयकर विभागाच्या लिंकवर जा. तुमच्या डाव्या बाजूला असलेल्या लाल रंगाच्या आधार लिंकवर क्लिक करा. तुमचं अकाऊंट बनलं नसेल तर रजिस्ट्रर करा. लाॅगइन केलं तर पेज ओपन होईल. वर दिसणाऱ्या निळ्या रंगाच्या स्ट्रिपमध्ये प्रोफाइल सेटिंग निवडा. प्रोफाईल सेटिंगमध्ये आधार कार्ड लिंक करायचं सेटिंग दिसेल. याला सिलेक्ट करा. सेक्शनमध्ये आपला आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा. त्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.

आता हेल्थ इन्शुरन्स घेणं झालं सोपं, झालेत 'हे' मोठे बदल

SMSनंही पॅन कार्ड आधारशी लिंक करता येतं. आयकर विभागानं सांगितलंय 567678 किंवा 56161वर SMS पाठवून तुम्ही पॅन कार्ड आधारला लिंक करू शकता.

VIDEO : शरद पवार Uncut प्रेस कॉन्फरन्स; म्हणाले, 27 तारखेला मीच ED ऑफिसला जाणार

First published: September 26, 2019, 7:00 AM IST
Tags: pan card

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading