5 सेंकदात 'डबल गोल सेव्ह'; असा भन्नाट video तुम्ही पाहिलाच नसेल!

5 सेंकदात 'डबल गोल सेव्ह'; असा भन्नाट video तुम्ही पाहिलाच नसेल!

एका सामन्यातील व्हिडिओ सध्या फुटबॉल चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल होत आहे.

  • Share this:

कौरो, 25 सप्टेंबर: भारतातील क्रिकेट वेड हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. पण भारतासारख्या देशात फुटबॉल क्रेझ ही वेगळीच आहे. भारत फुटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर फार समाधानकारक कामगिरी करू शकला नसला तरी येथील चाहते मात्र फुटबॉल सामने रात्रभर जागून पाहतात. फक्त फिफा वर्ल्ड कप नव्हे तर युरोप आणि अमेरिकेतील लीग स्पर्धा भारतात लोकप्रिय आहेत. क्रिकेटमधील एखाद्या भन्नाट कॅच किंवा षटकाराचा व्हिडिओ जसा व्हायरल होतो तसाच फुटबॉलमधील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

इजिप्तची राजधानी कौरो येथे इजिप्त प्रिमिअर लीग(Egyptian Premier League)मधील एका सामन्यातील व्हिडिओ सध्या फुटबॉल चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ही हैरान व्हाल. पिरेमिड्स(Pyramids) आणि ईएनपीपीआय या दोन संघांमध्ये सामना सुरु होता. या सामन्यात पिरेमिड्स संघाचा गोलकिपर महमूद गदी (Mahmoud Gadi)याने केलेल्या खेळीचे जगभरात कौतुक होत आहे. ईएनपीपीआय संघातील खेळाडूंनी मारलेला चेंडू पकडण्यासाठी गदी रिंगमधून बाहेर आला आणि त्याने चेंडू पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाच्या दिशेने पाठवला. पण त्याच वेळी ईएनपीपीआय संघाच्या खेळाडूने गोल पोस्टकडे चेंडू मारला. तेव्हा गदी मैदानाच्या मध्य भागात होता. गोल वाचवण्यासाठी गदीने वेगाने धाव घेतली आणि गोल पोस्टजवळ जाऊन चेंडूला हेड (डोक्याने) देत तो मैदानाच्या बाहेर पाठवला. गदीच्या या अफलातुन बचावाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि जगभरातील फुटबॉल चाहते त्याचा कौतुक करत आहेत.

एखाद्या फुटबॉल लीग स्पर्धेत गोल किपरकडून अशा प्रकारची कामगिरी पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे. केवळ 22 वर्षाच्या गदीने केवळ 5 सेंकदामध्ये दोन गोल वाचवले आहेत. जगभरातील नेटीझन्स गदीचे चाहते झाले आहेत. गदीने शानदार पद्धतीने गोल वाचवले असे एका युझरने म्हटले आहे. तर दुसऱ्या युझरने म्हटले आहे की, मैदानातील अन्य कोणत्याही खेळाडूपेक्षा गदी सर्वात वेगवान खेळाडू ठरला आहे.

काहींनी तर महमूद गदीच्या या बचावाला आतापर्यंतचा सर्वात शानदार 'डबल गोल सेव्ह' (The Greatest Double Save Ever)असे म्हटले आहे. अनेकवेळा आंतरराष्ट्रीय सामन्यात अशा पद्धतीने गोल सेव्ह केले जातात. पण लीग स्पर्धेत गदीने केलेल्या कामगिरीने सर्वजण तोडभरून कौतुक करत आहेत.

गवत सोडून खाल्लं जर्नल; IIT बॉम्बेच्या वसतीगृहात बैलाचा धुमाकूळ

Tags:
First Published: Sep 25, 2019 02:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading