हकालपट्टीनंतर आत्महत्येचा प्रयत्न, आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजबाहेर

हकालपट्टीनंतर आत्महत्येचा प्रयत्न, आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजबाहेर

राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मनसे नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, मुंबई, 11 फेब्रुवारी : मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले औरंगाबादचे माजी शहर सहसचिव अभय मांजरमकर आपल्या कुटुंबासह कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी हे कुटुंब मुंबईत आलं आहे.

मनसेतून काढल्यामुळे काही दिवसांपूर्वी मांजरमकर यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही कारवाई पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे आणि आकसापोटी झाली असल्याचं मांजरमकर यांचं म्हणणं आहे. आपली बाजू राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी मांजरमकर आपली आई,पत्नी आणि दोन मुलांसह कृष्ण कुंजच्या बाहेर सकाळपासून उभे आहेत.

अभय मांजरमकर यांनी कृष्णकुंजच्या आत जाण्यासाठी सकाळपासून अनेकदा प्रयत्न केले. मात्र त्यांना कुणीही आत घेतलं नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, आज राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मनसे नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखी पुढील रणनीती आखण्यासाठी कृष्णकुंज या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे लोकसभेच्या किती जागा लढवायच्या, याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे ही राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार असल्याची चर्चा होती. पण नुकतंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे आमच्यासोबत येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता मनसेच्या गोट्यातील हालचालींना वेग आला आहे.

तीन जागा लढवणार?

राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष लोकसभा निवडणुकीत तीन जागांवर लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या तीन जागा नक्की कोणत्या आहेत, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु यामध्ये मुंबई आणि नाशिकच्या जागांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत?

मनसे आणि राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीत उघड आघाडी होण्याची शक्यता कमी आहे. कारण या आघाडीला काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे या पक्षांमध्ये अंतर्गत समझोता होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास राष्ट्रवादीकडून मनसेचा उमेदवार असलेल्या ठिकाणी कमकुवत उमेदवार देऊन मनसेला अप्रत्यक्ष मदत केली जाऊ शकते.

...जेव्हा आदित्य ठाकरे गाईला चारा खाऊ घालतात, पाहा VIDEO

First published: February 11, 2019, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading