ममता ते ममता एक्सप्रेस...

ममता ते ममता एक्सप्रेस...

13 मेतृणमूल काँग्रेसला सत्तेवर आणत प. बंगालमधला डाव्यांचा गड उध्वस्त करणार्‍या ममता बॅनर्जी म्हणजे एक वादळी व्यक्तिमत्त्व. साधी, सुती साडी नेसणार्‍या आणि करारी बाणा दाखवणार्‍या ममता बॅनर्जी...साध्या, मध्यमवर्गीय घरात 5 जानेवारी 1955 ला जन्माला आलेल्या ममता म्हणजे अगदी हरहुन्नरी कन्या. शालेय जीवनापासूनच बंडखोर वृत्ती अंगात भिनलेली. त्यामुळे जयप्रकाश नारायणांच्या गाडीच्या बॉनेटवर चढून नाचणार्‍या ममता आजही बंगालच्या लक्षात आहेत. इस्लामचा इतिहास हा विषय घेऊन मास्टर डिग्री घेण असो की कायद्याची पदवी. ममतांनी सगळं झोकात पार पाडलं. 70 च्या दशकात बंगालच्या राजकारणात उलथापालथी होत असतानाच ममतांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. थोड्याच दिवसात त्यांना बंगाल काँग्रेसचे सरचिटणीस बनवण्यात आलं. आणि त्यानंतर 84 मध्ये थेट खासदारकीचं काँग्रेसचं तिकिट मिळवून चक्क सोमनाथ चटजीर्ंचा पराभव करत त्या लोकसभेत गेल्या. 91 आणि 96 च्या निवडणुकात दक्षिण कोलकातामधून त्या पुन्हा लोकसभेत गेल्या. 91 च्या नरसिंहरावांच्या सरकारात त्यांना पहिल्यांदाच केंद्रात राज्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यानंतर वेगवेगळी मंत्रीपद भूषवत असतानाच काँग्रेसच्या काही धोरणांशी आणि हायकमांडशी त्यांचे मतभेद व्हायला लागले.क्रीडामंत्री असताना हे मतभेद आणखी वाढले. त्यातच राज्यात काँग्रेस डाव्या पक्षांच्या हातचं बाहुलं बनत असल्याचा आरोप त्यांनी केला. वाढत्या इंधन किंमतींना विरोध, समाजवादीच्या अमरसिंगांची कॉलर ओढणं, रेल्वे बजेट सादर होत असताना रेल्वेमंत्री पासवानांवर शाल फेकणं, त्यातचं राजीनामा नाटय असं सगळे प्रकारही ममतांनी केले. पण त्यांचा काँग्रेसवरचा मूळ राग वाढतच होता. त्यातूनच मग शुद्ध काँग्रेस हवी, अशी हाक देत 1997 मध्ये ममतांनी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. आणि मग काँग्रेसपासून दुरावलेल्या ममता भाजपच्या एनडीए आघाडीत सामील झाल्या.99 च्या या मंत्रिमंडळात मग ममतांना महत्त्वाचे रेल्वेमंत्रीपद देण्यात आलं. पण 2000 चं बजेट सादर करताना प. बंगालसाठी काहीही केलं नाही. म्हणून ममतांवर जोरदार टीकाही झाली. अर्थातच मूळ काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या ममतांना भाजपेयी फारसे भावले नाहीतच त्यातच त्यांचं एनडीएशी फाटलं आणि 2001 च्या प. बंगालच्या निवडणुकांत त्यांनी अखेर काँग्रेसशी आघाडी केली.राज्यातून डाव्यांना संपवायचे त्यांचे डावपेच त्यावेळी यशस्वी झाले नाहीत. त्या पुन्हा 2004 मध्ये केंद्रात मंत्री म्हणून परतल्या, पण राज्याकडे त्यांचं लक्ष होतंच. 2005 मध्ये बंगालचे मुख्यमंंत्री बुद्धदेव भट्टाचार्यांच्या धोरणाला कडाडून विरोध करत, त्यांनी जोरदार निदर्शनही केली. पण हा तर विकासाला विरोध असा प. बंगालच्या नागरिकांचा समज झाला आणि त्याचा फटका ममतांना बसला. कोलकाता मनपाच्या निवडणुकांत त्याचे परिणाम लगेच दिसले. तृणमूलला मोठी हार पत्करावी लागली. 2006 च्या राज्य निवडणुकांतही त्याचे पडसाद उमटलेच आणि डाव्यांना सत्तेतून पायउतार करण्याचे ममतांचं स्वप्न पुन्हा भंगलं. यावेळी आधी मिळालेल्या निम्म्यापेक्षाही जास्त जागांवर ममतांना हार खावी लागली. आणि मग घडलं सिंगूरचं प्रकरण. टाटांच्या नॅनो गाड्यांच्या प्रोजेक्टसाठी जमीन अधिग्रहणाला ममतांनी कडवा विरोध केला. सरकारवर प्रचंड दबाव आणला. त्यातून नंदीग्रामचा हिंसाचार झाला. आणि गेली साडेतीन दशकं डाव्यांच्या मागे असलेलं जनमत उलटायला सुरुवात झाली. 2009 च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेससह आघाडी करत तृणमूलने तब्बल 26 जागा जिंकल्या. डाव्यांच्या घसरत्या लोकप्रियतेचंच हे चिन्ह होतं. ममता पुन्हा रेल्वे मंत्री झाल्या. आणि मग 2010 च्या कोलकाता मनपाच्या रणधुमाळीत डाव्यांना पुन्हा एकदा धोबीपछाड देत, ममतांनी तोही गड सर केला. आणि याच दरम्यान विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले. गेली 35 वर्ष अबाधित राज्य करणार्‍या डाव्यांची सत्ता उलथवण्याची हीच संधी असल्याचे चाणाक्ष ममतांनी बरोबर ओळखलं आणि राज्यभरात सरकारविरोधात प्रचाराचा धडाका लावला. तरुणाई मोठ्या प्रमाणात ममतांच्या मागे होती, जनमतही बदललं. डाव्यांच्या ते लक्षात आलं. पण वेळ निघून गेली होती.अखेर प. बंगालचा लाल गड ढासळला आणि प्रचंड मोठा विजय साकारत ममतांनी अखेर तृणमूलला सत्तेची खुर्ची दाखवलीच.

  • Share this:

13 मे

तृणमूल काँग्रेसला सत्तेवर आणत प. बंगालमधला डाव्यांचा गड उध्वस्त करणार्‍या ममता बॅनर्जी म्हणजे एक वादळी व्यक्तिमत्त्व. साधी, सुती साडी नेसणार्‍या आणि करारी बाणा दाखवणार्‍या ममता बॅनर्जी...

साध्या, मध्यमवर्गीय घरात 5 जानेवारी 1955 ला जन्माला आलेल्या ममता म्हणजे अगदी हरहुन्नरी कन्या. शालेय जीवनापासूनच बंडखोर वृत्ती अंगात भिनलेली. त्यामुळे जयप्रकाश नारायणांच्या गाडीच्या बॉनेटवर चढून नाचणार्‍या ममता आजही बंगालच्या लक्षात आहेत.

इस्लामचा इतिहास हा विषय घेऊन मास्टर डिग्री घेण असो की कायद्याची पदवी. ममतांनी सगळं झोकात पार पाडलं. 70 च्या दशकात बंगालच्या राजकारणात उलथापालथी होत असतानाच ममतांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

थोड्याच दिवसात त्यांना बंगाल काँग्रेसचे सरचिटणीस बनवण्यात आलं. आणि त्यानंतर 84 मध्ये थेट खासदारकीचं काँग्रेसचं तिकिट मिळवून चक्क सोमनाथ चटजीर्ंचा पराभव करत त्या लोकसभेत गेल्या. 91 आणि 96 च्या निवडणुकात दक्षिण कोलकातामधून त्या पुन्हा लोकसभेत गेल्या.

91 च्या नरसिंहरावांच्या सरकारात त्यांना पहिल्यांदाच केंद्रात राज्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यानंतर वेगवेगळी मंत्रीपद भूषवत असतानाच काँग्रेसच्या काही धोरणांशी आणि हायकमांडशी त्यांचे मतभेद व्हायला लागले.

क्रीडामंत्री असताना हे मतभेद आणखी वाढले. त्यातच राज्यात काँग्रेस डाव्या पक्षांच्या हातचं बाहुलं बनत असल्याचा आरोप त्यांनी केला. वाढत्या इंधन किंमतींना विरोध, समाजवादीच्या अमरसिंगांची कॉलर ओढणं, रेल्वे बजेट सादर होत असताना रेल्वेमंत्री पासवानांवर शाल फेकणं, त्यातचं राजीनामा नाटय असं सगळे प्रकारही ममतांनी केले.

पण त्यांचा काँग्रेसवरचा मूळ राग वाढतच होता. त्यातूनच मग शुद्ध काँग्रेस हवी, अशी हाक देत 1997 मध्ये ममतांनी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. आणि मग काँग्रेसपासून दुरावलेल्या ममता भाजपच्या एनडीए आघाडीत सामील झाल्या.

99 च्या या मंत्रिमंडळात मग ममतांना महत्त्वाचे रेल्वेमंत्रीपद देण्यात आलं. पण 2000 चं बजेट सादर करताना प. बंगालसाठी काहीही केलं नाही. म्हणून ममतांवर जोरदार टीकाही झाली. अर्थातच मूळ काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या ममतांना भाजपेयी फारसे भावले नाहीतच त्यातच त्यांचं एनडीएशी फाटलं आणि 2001 च्या प. बंगालच्या निवडणुकांत त्यांनी अखेर काँग्रेसशी आघाडी केली.

राज्यातून डाव्यांना संपवायचे त्यांचे डावपेच त्यावेळी यशस्वी झाले नाहीत. त्या पुन्हा 2004 मध्ये केंद्रात मंत्री म्हणून परतल्या, पण राज्याकडे त्यांचं लक्ष होतंच.

2005 मध्ये बंगालचे मुख्यमंंत्री बुद्धदेव भट्टाचार्यांच्या धोरणाला कडाडून विरोध करत, त्यांनी जोरदार निदर्शनही केली. पण हा तर विकासाला विरोध असा प. बंगालच्या नागरिकांचा समज झाला आणि त्याचा फटका ममतांना बसला.

कोलकाता मनपाच्या निवडणुकांत त्याचे परिणाम लगेच दिसले. तृणमूलला मोठी हार पत्करावी लागली. 2006 च्या राज्य निवडणुकांतही त्याचे पडसाद उमटलेच आणि डाव्यांना सत्तेतून पायउतार करण्याचे ममतांचं स्वप्न पुन्हा भंगलं. यावेळी आधी मिळालेल्या निम्म्यापेक्षाही जास्त जागांवर ममतांना हार खावी लागली.

आणि मग घडलं सिंगूरचं प्रकरण. टाटांच्या नॅनो गाड्यांच्या प्रोजेक्टसाठी जमीन अधिग्रहणाला ममतांनी कडवा विरोध केला. सरकारवर प्रचंड दबाव आणला. त्यातून नंदीग्रामचा हिंसाचार झाला. आणि गेली साडेतीन दशकं डाव्यांच्या मागे असलेलं जनमत उलटायला सुरुवात झाली.

2009 च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेससह आघाडी करत तृणमूलने तब्बल 26 जागा जिंकल्या. डाव्यांच्या घसरत्या लोकप्रियतेचंच हे चिन्ह होतं. ममता पुन्हा रेल्वे मंत्री झाल्या. आणि मग 2010 च्या कोलकाता मनपाच्या रणधुमाळीत डाव्यांना पुन्हा एकदा धोबीपछाड देत, ममतांनी तोही गड सर केला.

आणि याच दरम्यान विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले. गेली 35 वर्ष अबाधित राज्य करणार्‍या डाव्यांची सत्ता उलथवण्याची हीच संधी असल्याचे चाणाक्ष ममतांनी बरोबर ओळखलं आणि राज्यभरात सरकारविरोधात प्रचाराचा धडाका लावला. तरुणाई मोठ्या प्रमाणात ममतांच्या मागे होती, जनमतही बदललं.

डाव्यांच्या ते लक्षात आलं. पण वेळ निघून गेली होती.अखेर प. बंगालचा लाल गड ढासळला आणि प्रचंड मोठा विजय साकारत ममतांनी अखेर तृणमूलला सत्तेची खुर्ची दाखवलीच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2011 05:35 PM IST

ताज्या बातम्या