निलंबित पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे तरुणीसोबत सीसीटीव्हीत कैद

निलंबित पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे तरुणीसोबत सीसीटीव्हीत कैद

10 मेकोल्हापूर पोलीस दलातल्या प्रशिक्षणार्थी महिला कॉन्स्टेबल लैंगिक अत्याचार प्रकरण बाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे बलात्काराचा आरोप असणार्‍या हेड कॉन्स्टेबल युवराज कांबळेसह होम डीवायएसपी विजय परकाळे आणि शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे यांना निलंबित केलं.आता या प्रकरणाची नवी माहिती पुढे आलीय. शाहुपुरी पोलीस स्टेशनचे निलंबित पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे हे कोल्हापुरातल्या एका हॉटेलमध्ये तरुणीसोबत सीसीटीव्हीत कैद झालेत. या फुटेजमध्ये ज्ञानेश्वर मुंडे हे खाकी वर्दीत आहेत. ते हॉटेलच्या एका खोलीत गेल्यानंतर एक व्यक्ती एका मुलीला घेऊन रुममध्ये जाते आणि लगेच बाहेर पडते. त्यानंतर तासाभराने ती तरुणी आणि ज्ञानेश्वर मुंडे बाहेर पडतात. ज्ञानेश्वर मुंडे यांच्यासोबत गेलेल्या हॉटेलमध्ये गेलेली ही तरुणी कोण ? ज्ञानेश्वर मुंडे या हॉटेलच्या रुममध्ये काय करत होते असे प्रश्न निर्माण झालेत.

  • Share this:

10 मे

कोल्हापूर पोलीस दलातल्या प्रशिक्षणार्थी महिला कॉन्स्टेबल लैंगिक अत्याचार प्रकरण बाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे बलात्काराचा आरोप असणार्‍या हेड कॉन्स्टेबल युवराज कांबळेसह होम डीवायएसपी विजय परकाळे आणि शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे यांना निलंबित केलं.

आता या प्रकरणाची नवी माहिती पुढे आलीय. शाहुपुरी पोलीस स्टेशनचे निलंबित पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे हे कोल्हापुरातल्या एका हॉटेलमध्ये तरुणीसोबत सीसीटीव्हीत कैद झालेत. या फुटेजमध्ये ज्ञानेश्वर मुंडे हे खाकी वर्दीत आहेत. ते हॉटेलच्या एका खोलीत गेल्यानंतर एक व्यक्ती एका मुलीला घेऊन रुममध्ये जाते आणि लगेच बाहेर पडते. त्यानंतर तासाभराने ती तरुणी आणि ज्ञानेश्वर मुंडे बाहेर पडतात. ज्ञानेश्वर मुंडे यांच्यासोबत गेलेल्या हॉटेलमध्ये गेलेली ही तरुणी कोण ? ज्ञानेश्वर मुंडे या हॉटेलच्या रुममध्ये काय करत होते असे प्रश्न निर्माण झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2011 02:42 PM IST

ताज्या बातम्या