जळगावमध्ये उन्हाचा पारा 46 वर

जळगावमध्ये उन्हाचा पारा 46 वर

03 मेजळगाव जिल्ह्यात कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. भुसावळ शहरात आज मंगळवारी तापमान 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. गेल्या 4 दिवसांपासून राज्यातील सगळ्यांत जास्त तापमानाची नोंद ही जळगाव जिल्ह्यात होत आहे. शासकीय रूग्णालयासह जिल्ह्यातील सर्व उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात उष्माघाताचे रुग्ण दाखल आहे. या ठिकाणी उष्माघातासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आला. गेल्या वर्षी 49.9 अंश तापमानाची नोंद फैजपूर इंथं झाली होती. सध्याच्या तापमानाची परिस्थिती पाहून यंदा उन्हाचा पारा 50 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या 2 महिन्यात आतापर्यंत 6 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा दावा मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पण प्रशासनाने मात्र हा दावा फेटाळला आबे. उन्हाचा फटका बसल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात पोहचणही रुग्णांना अवघड झालं आहे.

  • Share this:

03 मे

जळगाव जिल्ह्यात कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. भुसावळ शहरात आज मंगळवारी तापमान 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. गेल्या 4 दिवसांपासून राज्यातील सगळ्यांत जास्त तापमानाची नोंद ही जळगाव जिल्ह्यात होत आहे.

शासकीय रूग्णालयासह जिल्ह्यातील सर्व उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात उष्माघाताचे रुग्ण दाखल आहे. या ठिकाणी उष्माघातासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आला. गेल्या वर्षी 49.9 अंश तापमानाची नोंद फैजपूर इंथं झाली होती. सध्याच्या तापमानाची परिस्थिती पाहून यंदा उन्हाचा पारा 50 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

गेल्या 2 महिन्यात आतापर्यंत 6 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा दावा मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पण प्रशासनाने मात्र हा दावा फेटाळला आबे. उन्हाचा फटका बसल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात पोहचणही रुग्णांना अवघड झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2011 06:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading