क्रूरकर्मा लादेनचा अंत ; ट्विटरवर प्रतिक्रिया

02 मेअल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि अमेरिकेवर हल्ला करणारा जगातला मोस्ट वान्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेनचा अखेर अंत झाला आहे. याबद्दल टिवटरच्या माध्यमातून जगभरातील मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे. - नेल्सन मंडेला म्हणतात, 'आज फक्त अमेरिकेचाच नाही तर जे सगळे दहशतवादाविरुद्ध गेली अनेक वर्ष लढतायत त्यांचा विजय आहे.' - दलाई लामा - ओसामा बिन लादेन ठार झाला. जागतिक शांतीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट घडली. -वेल घोनीम - 2011 हे वर्ष इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल. आता तर फक्त मे महिना सुरु आहे, पण किती गोष्टी घडल्यात. ट्युनिशिया, इजिप्त, लिबिया, येमेन, सिरिया आणि आता लादेनचा अंत . इम्रान खान - ओसामा बिन लादेन ठार झालाय. पाकिस्ताननं आता या वादातून लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे. पाकिस्तानातील स्थानिक लोक हे दहशतवादात सहभागी नाहीत. लॅरी किंग - अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याला आता काही महिन्यांतच 10 वर्ष पूर्ण होतील आणि त्याअगोदरच ओसामा ठार झाला. ही खूप मोठी कामगिरी म्हणावी लागेल.शेखर कपूर - नक्कीच अमेरिकेला ओसामा जिवंत हवा होता, पण थोडीफार चूक झाली. अपेक्षा करुयात भारत सरकार दाऊदला जिवंत पकडेल. तुषार गांधी - ओसामा बिन लादेन अखेर ठार झालाय. ओबामांसाठी ही एकमेव मोठी कामगिरी आहे. म्हणजे ओबामा आता दुसर्‍यांदा निवडून येणार हे नक्की महेश भट - सगळं जग सध्या ओसामा बिन लादेन ठार झाल्याचा जल्लोष करतंय. पण जगातल्या दुसर्‍या मोठ्या अतिरेक्याला म्हणजे 'जॉर्ज बुचर बुश' ला कोण पकडेल? प्रितीश नंदी - ओसामा हा खूनी नव्हता, पण त्यानं इतरांना कत्तल करण्यासाठी प्रवृत्त केलं. पण ही प्रवृत्ती इतक्या लवकर संपेल का?

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 2, 2011 05:55 PM IST

क्रूरकर्मा लादेनचा अंत ; ट्विटरवर प्रतिक्रिया

02 मे

अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि अमेरिकेवर हल्ला करणारा जगातला मोस्ट वान्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेनचा अखेर अंत झाला आहे. याबद्दल टिवटरच्या माध्यमातून जगभरातील मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे.

- नेल्सन मंडेला म्हणतात, 'आज फक्त अमेरिकेचाच नाही तर जे सगळे दहशतवादाविरुद्ध गेली अनेक वर्ष लढतायत त्यांचा विजय आहे.' - दलाई लामा - ओसामा बिन लादेन ठार झाला. जागतिक शांतीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट घडली. -वेल घोनीम - 2011 हे वर्ष इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल. आता तर फक्त मे महिना सुरु आहे, पण किती गोष्टी घडल्यात. ट्युनिशिया, इजिप्त, लिबिया, येमेन, सिरिया आणि आता लादेनचा अंत .

इम्रान खान - ओसामा बिन लादेन ठार झालाय. पाकिस्ताननं आता या वादातून लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे. पाकिस्तानातील स्थानिक लोक हे दहशतवादात सहभागी नाहीत.

लॅरी किंग - अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याला आता काही महिन्यांतच 10 वर्ष पूर्ण होतील आणि त्याअगोदरच ओसामा ठार झाला. ही खूप मोठी कामगिरी म्हणावी लागेल.

शेखर कपूर - नक्कीच अमेरिकेला ओसामा जिवंत हवा होता, पण थोडीफार चूक झाली. अपेक्षा करुयात भारत सरकार दाऊदला जिवंत पकडेल.

तुषार गांधी - ओसामा बिन लादेन अखेर ठार झालाय. ओबामांसाठी ही एकमेव मोठी कामगिरी आहे. म्हणजे ओबामा आता दुसर्‍यांदा निवडून येणार हे नक्की

महेश भट - सगळं जग सध्या ओसामा बिन लादेन ठार झाल्याचा जल्लोष करतंय. पण जगातल्या दुसर्‍या मोठ्या अतिरेक्याला म्हणजे 'जॉर्ज बुचर बुश' ला कोण पकडेल?

प्रितीश नंदी - ओसामा हा खूनी नव्हता, पण त्यानं इतरांना कत्तल करण्यासाठी प्रवृत्त केलं. पण ही प्रवृत्ती इतक्या लवकर संपेल का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2011 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...