25 वर्षांनंतर फक्त 'या' दोन मिनिटांच्या सीनसाठी एकत्र आले संजय- माधुरी

25 वर्षांनंतर फक्त 'या' दोन मिनिटांच्या सीनसाठी एकत्र आले संजय- माधुरी

संपूर्ण सिनेमात किमान असे तीन ते चार सीन होते जेव्हा फ्लॅश बॅकच्या मार्फत संजय आणि माधुरीची प्रेम कहाणी खुलवता येऊ शकत होती.

  • Share this:

मुंबई, १८ एप्रिल- जवळपास २५ वर्षानंतर माधुरी दीक्षित आणि संजय दत्त कलंक सिनेमात एकत्र काम करताना दिसले. या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. या दोघांना पाहायला जाणाऱ्यांसाठी मात्र मोठी निराशा असणार आहे. दोघांचा ऑनस्क्रीन रोमान्स पाहायला मिळेल असेच अनेकांना वाटत होते. मात्र तसे काही होणार नाही.

तीन तासांच्या या सिनेमात संजय आणि माधुरी यांची जोडी दाखवण्यात आल्याचं कळतं. त्यांच्या संवादातूनही कळून येतं की सिनेमात दोघं दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांचा जफर (वरुण धवन) हा एक मुलगा असतो.

संपूर्ण सिनेमात प्रेक्षक दोघांना एकत्र पाहण्याची वाट पाहत असतात. पण ९० च्या दशकातली ही हिट जोडी संपूर्ण सिनेमात फक्त एकाच सीनमध्ये एकत्र दिसली आहे. सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये दोघांचा फक्त दोन मिनिटांचा एक सीन दाखवण्यात आला आहे. यानंतर सिनेमा संपेपर्यंत माधुरी आणि संजय एकत्र दिसत नाहीत.

संपूर्ण सिनेमात किमान असे तीन ते चार सीन होते जेव्हा फ्लॅश बॅकच्या मार्फत संजय आणि माधुरीची प्रेम कहाणी खुलवता येऊ शकत होती. पण दोघांच्या वाट्याला एकच सीन आला. या एकमेव सीनमध्ये संजय माधुरीला त्याचं कुटुंब तुटण्यापासून वाचवण्याची विनंती करताना दिसतो. अनैतिक संबंधातून जन्माला आलेला मुलाने (जफर) त्याच्या कुटुंबापासून दूर रहायला संजय माधुरीकडे आलेला असतो.

या सीनमध्ये माधुरी आणि संजयमध्ये फक्त १० संवाद आहेत. दोघं भूतकाळात रममाण होणार इतक्यात वरुण तिथे येतो आणि स्वतःला आई- बापापासून दूर केल्याचा जाब संजयकडे मागतो. यानंतर संजय त्याच्या कानशिलात लगावतो आणि तिथून निघून जातो.

VIDEO: दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

First published: April 18, 2019, 3:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading