ठाण्याच्या विभाजनासाठी रास्ता रोको आंदोलन
30 एप्रिलठाणे जिल्ह्याचे विभाजन व्हावे या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज शनिवारी जिल्ह्यात 13 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. श्रमजीवीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली घोडबंदर इथल्या फाऊंटन हॉटेलसमोर हे आंदोलन करण्यात आले. पण यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. राज्य सरकारने 1989 साली जिल्हा विभाजनाची घोषणा केली होती. परंतु ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भाग होऊनसुद्धा अजूपही जिल्हा विभाजन झाले नाही, त्याचा निषेध करण्यात आला.

30 एप्रिल
ठाणे जिल्ह्याचे विभाजन व्हावे या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज शनिवारी जिल्ह्यात 13 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. श्रमजीवीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली घोडबंदर इथल्या फाऊंटन हॉटेलसमोर हे आंदोलन करण्यात आले. पण यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. राज्य सरकारने 1989 साली जिल्हा विभाजनाची घोषणा केली होती. परंतु ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भाग होऊनसुद्धा अजूपही जिल्हा विभाजन झाले नाही, त्याचा निषेध करण्यात आला.
First published:
April 30, 2011, 12:48 PM IST
Tags: