तेजस्विनी पंडित 'आधी बसू मग बोलू'मध्ये

तेजस्विनी पंडित 'आधी बसू मग बोलू'मध्ये

28 एप्रिलनिर्माती लता नार्वेकर यांचं 'आधी बसू मग बोलू' हे नवीन नाटक येत्या अक्षयतृत्तीयेच्या मुर्हतावर रंगभूमीवर येणार आहे. लेखक विद्यासागर अध्यापक यांनी या नाटकाचे लेखन केल आहे. तर याचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी करत आहे. तर मी सिंधुताई सपकाळ फेम तेजस्विनी पंडितचे हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. मन उधाण वार्‍याचे या नाटकाच्या यशानंतर लता नार्वेकर यांनी या ब्लॅक कॉमेडी नाटकाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. हलकेफुलके विनोद आणि उत्तम निर्मितीमुल्ये असणार्‍या या नाटकात संजय नार्वेकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार आणि योगिनी चौक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 6 मेला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे.

  • Share this:

28 एप्रिल

निर्माती लता नार्वेकर यांचं 'आधी बसू मग बोलू' हे नवीन नाटक येत्या अक्षयतृत्तीयेच्या मुर्हतावर रंगभूमीवर येणार आहे. लेखक विद्यासागर अध्यापक यांनी या नाटकाचे लेखन केल आहे. तर याचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी करत आहे. तर मी सिंधुताई सपकाळ फेम तेजस्विनी पंडितचे हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे.

मन उधाण वार्‍याचे या नाटकाच्या यशानंतर लता नार्वेकर यांनी या ब्लॅक कॉमेडी नाटकाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. हलकेफुलके विनोद आणि उत्तम निर्मितीमुल्ये असणार्‍या या नाटकात संजय नार्वेकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार आणि योगिनी चौक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 6 मेला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे.

First published: April 28, 2011, 1:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या