Elec-widget

मुंबईचा चेन्नईवर 'सुपर' विजय

मुंबईचा चेन्नईवर 'सुपर' विजय

22 एप्रिलमुंबई इंडियन्सनं चेन्नईवर सुपर विजय मिळवला आहे. पण चेन्नईच्या एस बद्रीनाथने विजयासाठी अखेरपर्यंत झुंज दिली. बद्रीनाथने 48 बॉलमध्ये नॉटआऊट 71 रन्स केले. तर मायकेल हसीनं 41 रन्स केले. पण चेन्नईचे इतर बॅट्समन मात्र फ्लॉप ठरले. मुंबईची बॉलिंगही दमदार झाली. हरभजन सिंग सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला. त्याने चार ओव्हरमध्ये फक्त 18 रन्स देत पाच विकेट घेतल्या. तर लसिथ मलिंगाने 2 विकेट घेत विजयात महत्वाचा वाटा उचलला. मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. आर सतिश आणि सचिन तेंडुलकर ही मुंबईची ओपनिंग जोडी झटपट आऊट झाली. पण यानंतर रोहित शर्मा आणि ऍण्ड्र्यु सायमंडने फटकेबाजी करत टीमला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला.तर रोहित शर्माने सर्वाधिक स्कोर केला. अवघ्या 48 बॉलमध्ये त्यानं 87 रन्स केले. यात त्यानं 8 फोर आणि 5 सिक्स मारले. आणि सायमंडने 26 बॉलमध्ये 2 सिक्स मारत नॉटआऊट 31 रन्स केले.

  • Share this:

22 एप्रिल

मुंबई इंडियन्सनं चेन्नईवर सुपर विजय मिळवला आहे. पण चेन्नईच्या एस बद्रीनाथने विजयासाठी अखेरपर्यंत झुंज दिली. बद्रीनाथने 48 बॉलमध्ये नॉटआऊट 71 रन्स केले. तर मायकेल हसीनं 41 रन्स केले. पण चेन्नईचे इतर बॅट्समन मात्र फ्लॉप ठरले. मुंबईची बॉलिंगही दमदार झाली. हरभजन सिंग सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला. त्याने चार ओव्हरमध्ये फक्त 18 रन्स देत पाच विकेट घेतल्या. तर लसिथ मलिंगाने 2 विकेट घेत विजयात महत्वाचा वाटा उचलला.

मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. आर सतिश आणि सचिन तेंडुलकर ही मुंबईची ओपनिंग जोडी झटपट आऊट झाली. पण यानंतर रोहित शर्मा आणि ऍण्ड्र्यु सायमंडने फटकेबाजी करत टीमला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला.तर रोहित शर्माने सर्वाधिक स्कोर केला. अवघ्या 48 बॉलमध्ये त्यानं 87 रन्स केले. यात त्यानं 8 फोर आणि 5 सिक्स मारले. आणि सायमंडने 26 बॉलमध्ये 2 सिक्स मारत नॉटआऊट 31 रन्स केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2011 06:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...