अधिवेशनाच्या शेवट इंनिगला जलसंपत्ती विधेयकासाठी बॅटिंग !

21 एप्रिलअर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. जलसंपत्ती नियमन विधेयक सुधारणेसह परत विधानसभेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलंय. त्यामुळे हे वादग्रस्त विधेयक विधानसभेत मंजूर करुन घेण्याचा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न असेल. तसेच शालेय शिक्षणासंबंधीचे फी नियंत्रण कायदा विधेयकावरसु्‌द्धा आज चर्चा होणार आहे. त्यामुळे हेही विधेयक आज मंजूर करुन घेण्याचे सरकारने ठरवले आहे. याखेरीज वसई विरार महापालिकेतून काही गाव वगळण्याबाबतचा निर्णय खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज जाहीर करणार असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2011 09:49 AM IST

अधिवेशनाच्या शेवट इंनिगला जलसंपत्ती विधेयकासाठी बॅटिंग !

21 एप्रिल

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. जलसंपत्ती नियमन विधेयक सुधारणेसह परत विधानसभेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलंय. त्यामुळे हे वादग्रस्त विधेयक विधानसभेत मंजूर करुन घेण्याचा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न असेल.

तसेच शालेय शिक्षणासंबंधीचे फी नियंत्रण कायदा विधेयकावरसु्‌द्धा आज चर्चा होणार आहे. त्यामुळे हेही विधेयक आज मंजूर करुन घेण्याचे सरकारने ठरवले आहे. याखेरीज वसई विरार महापालिकेतून काही गाव वगळण्याबाबतचा निर्णय खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज जाहीर करणार असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2011 09:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...