21व्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल - मोदी

21व्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल - मोदी

 • Share this:

Modi1_PTI

28 सप्टेंबर :  लोकशाही, लोकसंख्या आणि भारतीय बाजारपेठ या भारताच्या विकासासाठीच्या तीन मुख्य गोष्टी असून मोठी बाजारपेठ असल्यामुळे भारताला जगभर मागणी आहे,असं म्हणत भारताची 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे. युवा पिढी ही भारताचे बलस्थान आहे आणि म्हणूनच 21व्या शतकातील जगाचे नेतृत्त्व भारत करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला.अमेरिकेतील 'मॅडिसन स्क्वेअर'वर सुमारे 20 हजार अनिवासी भारतीयांसमोर पंतप्रधानांनी तासभर उत्स्फूर्त भाषण केले.

'ते आले... ते बोलले आणि त्यांनी जिंकले' अशी काहीशी स्थिती उपस्थितांची झाली होती. परदेशातली एखाद्या देशाच्या प्रमुखाने मॅडिसन स्क्वेअर येथे भाषण करण्याची ही पहिली वेळ होती. मोदी यांनी फिरत्या रंगमंचावर उभे राहून भाषण केले.'मोदी..मोदी..मोदी.', 'भारत माता की जय' अशा घोषणांनी मॅडिसन स्क्वेअर अक्षरश: दुमदुमून गेले होते. मोदींच्या भाषणाला लागलेल्या रांगा, याचि देही याचि डोळा हे भाषण अनुभवण्यासाठी झालेली गर्दीतून मोदी काय बोलणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सुमारे तासाभरापेक्षा जास्त वेळ केलेल्या भाषणाची सुरवात मोदी यांनी 'भारतमाता की जय' या जयघोषानं आणि सर्वांना नवरात्राच्या शुभेच्छा देऊन केली. त्यांनी संपूर्ण भाषण हिंदीतच केले. या कार्यक्रमाचं प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवरही थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. यावेळी मोदींनी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सत्काराबद्दल आभार मानले.

भारत हा तरूणांचा देश असून पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम आम्ही यशस्वी केली. या मोहिमेसाठी मंगळयानाला प्रतिकिमी फक्त 7 रुपये खर्च आला, असं सांगत मोदींनी भारतीय शास्त्रज्ञांनी पाठ थोपाटली. मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये 21 व्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मातृभूमीच्या विकासासाठी साथ द्या. 'मेक इन इंडिया'च्या या अभियानाच्या माध्यमातून भारताशी जोडून घ्या',असं भावनिक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिवासी भारतीयांना केले.

मोदी यांनी अमेरिकेच्या लोकशाहीचाही गौरव करत म्हणाले, अमेरिका ही जगातील सर्वांत पुरातन लोकशाही आहे. तर भारत हा जगातील सर्वांत लोकशाही प्रधान देश आहे. अमेरिकेच्या कानाकोपर्‍यात जगभरातील लोक पसरले आहेत. तर भारतीय जगाच्या कानाकोपर्‍यात पोचले आहेत. हाच दोन्ही राष्ट्रांना जोडणार दुवा आहे.भारताने सुशिक्षित मनुष्यबळ जगाला निर्यात करावे. आज सर्वाधिक तरुण हे आपल्या देशामध्ये आहेत. जगभरात सर्वत्र कुशल मनुष्यबळाची गरज असल्याचं ही सांगितलं.

महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीचा संदर्भ देत त्यांनी गांधीजींच्या 1915 मध्ये भारतात परत येण्याचा दाखला दिला. भारतीय स्वातंत्र्याच्या 2022 मधील अमृतमहोत्सवापूर्वी स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करून गांधीजींच्या स्मृतीचा आदर राखण्याचा संकल्पही त्यांनी सोडला. भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी,व्हिसाची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासोबतच अनेक सवलतींच्या घोषणाही केल्या.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला केवळ अमेरिकेतलेच नाही तर शेजारच्या अनेक देशांमधले भारतीय भाषण ऐकण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले होते. तर अमेरिकनं काँग्रेसचे अनेक सदस्य आणि अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या...या कार्यक्रमात गायिका कविता कृष्णमूर्तीच्या गाण्याच्या तालावर एका चित्रकारानं पंतप्रधान मोदींचं चित्र रेखाटलं...

मोदीच्या भाषणातले आतापर्यंत मुद्दे

 • पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरु
 • अमेरिका मे बसे हुए, मेरे प्यारे भाई-और बेहणो...मोदींचं भाषण सुरू
 • सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो
 • नवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर मला तुमच्याशी भेटायची संधी मिळाली हे माझं भाग्य
 • न्यूयॉर्कमध्ये सत्कार हा सन्मान - मोदी
 • अनिवासी भारतीयांनी देशाची मान उंचावली - मोदी
 • भारत हा आता डोंबार्‍यांचा देश नाही तंत्रज्ञानाच्या बळावर युवकांनी जगात नाव कमावलंय - मोदी
 • लोकसभेतला विजय ऐतिहासिक- मोदी
 • जगानं या विजयाचा हेवा केलाय, 30 वर्षानंतर असं बहुमत मिळालंय- मोदी
 • लोकसभेतला विजय ही मोठी जबाबदारी - मोदी
 • तुम्हाला कमीपणा वाटेल असं काहीच करणार नाही - मोदी
 • लोकांना परिवर्तन पाहिजे
 • जग बदलतंय, भारतही बदलतोय- मोदी
 • भारतात आर्थिक आणि सामाजिक बदलासाठी कसर ठेवणार नाही - मोदी
 • अनिवासी भारतीयांच्या सरकारकडून अपेक्षा
 • या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ- मोदी
 • ऐकविसावं शतक आशियाचं, ऐकविसावं शतक भारताचं - मोदी
 • भारत हा तरूणांचा देश
 • सर्वाच प्राचिन संस्कृती आणि सर्वात तरूण देश - मोदी
 • भारत वेगानं पुढं जातोय - मोदी
 • लोकशाही, तरूणांची शक्ती आणि विशाल बाजारपेठ या तीन गोष्टींवर प्रगती होणं शक्य - मोदी
 •  लोकांचा विकास असेल तरच विकास - मोदी
 • लोकसहभागाशिवाय विकास अशक्य - मोदी
 • 21व्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल - मोदी
 • तुमचं दु:ख माहित आहे - मोदी
 • माझा हा प्रयत्न आहे की विकास हे जनआंदोलन व्हावं
 • माझा हा विश्वास आहे असा दिवस येईल की देशातल्या प्रत्येक कोपर्‍यातल्या माणसाला असं वाटेल की मला माझ्या देशाला पुढे न्यायचयं
 • आम्ही जगातल्या देशांना वर्कफोर्स देऊ
 •  भारताच्या यशस्वी मंगळ मोहिमेचं मोदींकडून कौतुक
 • भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा जगातला पहिला देश
 • अगदी अल्प खर्चात आपण यशस्वी मंगळ मोहीम यशस्वी केली
 • आपण आता जगाला नोकर्‍या देऊया
 • आपण आपली कौशल्यं विकसित करायला हवीत
 • रिक्षानं 1 किमी जायला 10 रुपये लागतात
 • पण भारतीय तरुणांनी मंगळावर जाण्यासाठी 1 किमीला फक्त 7 रुपये वापरले
 • भारतीय शास्त्रज्ञांचं मला कौतुक आहे
 • आपण महत्त्वाकांक्षी जनधन योजना सुरु केली आहे
 • मेक इन इंडियासाठी
 • मोदींनी दिलं निमंत्रण
 • अनिवासभारतीयांना निमंत्रण
 • जुनाट कायदे बदलणार
 • गंगा स्वच्छतेसाठी मदत करा - मोदी
 • गांधीजींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या दिडशेव्या जयंती दिनी आपण 'स्वच्छ भारता'ची भेट देऊ
 • स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होत असताना 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न
 • यावेळी 'प्रवासी भारत दिन' अहमदाबादमध्ये
 • 'पीआयओ' कार्ड असणाऱ्यांना आजीवन व्हिसा देणार
 • अमेरिकी पर्यंटकांसाठी 'व्हिसा ऑन अरायव्हल' योजना लवकरच

Follow @ibnlokmattv

First published: September 28, 2014, 10:49 PM IST

ताज्या बातम्या