राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली, मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली, मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी NCP चा अजेंडा काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

  • Share this:

मुंबई, 1 मार्च : आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन केलं आहे.  मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मार्गदर्शन केले जाणार आहे. पक्षाची भूमिका, महाविकास आघाडीत पक्षाचा अजेंडा, मुंबई शहरासाठी घेतलेले निर्णय यावर चर्चा केली जाणार आहे.

गेली काही वर्षात राष्ट्रवादी पक्षाची मुंबईतील ताकद कमी झाली होती. मात्र आता सत्ता आल्यानंतर पुन्हा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी 'मिशन-२०२२-मुंबई महानगरपालिका' या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने आज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सोमय्या मैदान, चुनाभट्टी, मुंबई येथे एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधी व न्याय मंत्री आदिती तटकरे हे उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होणार असून या एनसीपी कार्यकर्ता शिबिराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई अध्यक्ष आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक करणार आहेत.

हे वाचा - रश्मी ठाकरे आता सामनाच्या नव्या संपादक, या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी सोडलं पद

2014 नंतर फडवणीस सरकार आल्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झाली होती. आता महाविकास आघाडीचं एकत्रित सरकार आले आहे. राष्ट्रवादीपेक्षा मुंबईत काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद अधिक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःची ताकद वाढवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. कार्यकर्ता शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले जात आहे.

First published: March 1, 2020, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading