जुण्या गाण्यात नवा 'दम'

जुण्या गाण्यात नवा 'दम'

15 एप्रिलहल्ली अनेक गाजलेल्या गाण्याचे रिमेक होत आहे. सध्या दम मारो दमचं गाणं भलतंच गाजतंय या गाण्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.देव आनंद यांच्या हरे रामा हरे कृष्णा या सिनेमातील झीनत आमनवर चित्रीत केलेलं हे गाणं आजही लोकांना आवडतं. मात्र हल्ली रिमेकच्या जमान्यात या ओरिजनल गाण्यातल्या गोडवा बाजुला सारत रोहन सिप्पीच्या दम मारो दम सिनेमात या गाण्यावर दीपिका थिरकताना दिसत आहे.देव आनंद, झीनत अमान यांनी तर या रिमेकला नापसंती दर्शवली आहे पण अभिषेक बच्चन मात्र एवढं सगळं असताना आपल्या झीनत यांचं कौतुक करतोय. पण दुसर्‍याच क्षणी आपल्या सिनेमातलं गाणं कसं चांगलं आहे हे ही पटवुन देतो. तसेच या सगळ्या कडे तटस्थ पणे बघणारा आजचा आघाडीचा गायक सोनु निगमलाही या गाण्यावर आक्षेप आहे. आता पुढे एखाद्या गाण्याचं रिमिक्स झालं तर त्यातला गोडवा हरवू नये या कडे मात्र दिग्दर्शकांनी लक्ष द्यायला हवं.

  • Share this:

15 एप्रिल

हल्ली अनेक गाजलेल्या गाण्याचे रिमेक होत आहे. सध्या दम मारो दमचं गाणं भलतंच गाजतंय या गाण्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देव आनंद यांच्या हरे रामा हरे कृष्णा या सिनेमातील झीनत आमनवर चित्रीत केलेलं हे गाणं आजही लोकांना आवडतं. मात्र हल्ली रिमेकच्या जमान्यात या ओरिजनल गाण्यातल्या गोडवा बाजुला सारत रोहन सिप्पीच्या दम मारो दम सिनेमात या गाण्यावर दीपिका थिरकताना दिसत आहे.

देव आनंद, झीनत अमान यांनी तर या रिमेकला नापसंती दर्शवली आहे पण अभिषेक बच्चन मात्र एवढं सगळं असताना आपल्या झीनत यांचं कौतुक करतोय. पण दुसर्‍याच क्षणी आपल्या सिनेमातलं गाणं कसं चांगलं आहे हे ही पटवुन देतो. तसेच या सगळ्या कडे तटस्थ पणे बघणारा आजचा आघाडीचा गायक सोनु निगमलाही या गाण्यावर आक्षेप आहे. आता पुढे एखाद्या गाण्याचं रिमिक्स झालं तर त्यातला गोडवा हरवू नये या कडे मात्र दिग्दर्शकांनी लक्ष द्यायला हवं.

First published: April 15, 2011, 12:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या