आयपीएलमधून श्रीलंकेच्या खेळाडूंना परत बोलावले

आयपीएलमधून श्रीलंकेच्या खेळाडूंना परत बोलावले

13 एप्रिलआयपीएल सुरु होऊन फक्त एक आठवडा लोटला आहे आणि तेवढ्यातच श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने सगळ्या टीमना एक दणका दिला आहे. त्यांनी आयपीएलमध्ये खेळणार्‍या लंकन खेळाडूंना पाच मेपर्यंत मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. श्रीलंकेची टीम 14 मेपासून इंग्लंडच्या दौर्‍यावर जात आहे. या दौर्‍याच्या तयारीसाठी लंकन बोर्डाने हा फतवा काढला आहे. श्रीलंकेचे 9 खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यापैकी महेला जयवर्धने आणि कुमार संघकारा तर टीमचे कॅप्टन आहेत. शिवाय दिलशान, मलिंगा, सूरज रणदीव आणि दिलहारा फर्नांडो यांनाही परत जावं लागेल. पण मुथय्या मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकेल.

  • Share this:

13 एप्रिल

आयपीएल सुरु होऊन फक्त एक आठवडा लोटला आहे आणि तेवढ्यातच श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने सगळ्या टीमना एक दणका दिला आहे. त्यांनी आयपीएलमध्ये खेळणार्‍या लंकन खेळाडूंना पाच मेपर्यंत मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. श्रीलंकेची टीम 14 मेपासून इंग्लंडच्या दौर्‍यावर जात आहे. या दौर्‍याच्या तयारीसाठी लंकन बोर्डाने हा फतवा काढला आहे.

श्रीलंकेचे 9 खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यापैकी महेला जयवर्धने आणि कुमार संघकारा तर टीमचे कॅप्टन आहेत. शिवाय दिलशान, मलिंगा, सूरज रणदीव आणि दिलहारा फर्नांडो यांनाही परत जावं लागेल. पण मुथय्या मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2011 03:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...