मुख्यमंत्र्यांना आमदार होण्यासाठी 11 मेची डेडलाईन

12 एप्रिलकोणत्याही परिस्थितीत 11 मे पूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार होणं बंधनकारक आहे. पण अद्याप निवडणूक आयोगाने त्यांच्या विधानपरिषद निवडणुकीची अधिसूचना जारी केलेली नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये घालमेल सुरू झाली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार होणं आवश्यक आहे. त्यांच्याजागी काँग्रेसने संजय दत्त यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावला. पण संजय दत्त यांच्यासह 10 आमदारांची विधानपरिषदेवरची निवड अवैध ठरवावी यासाठी शिवसेना मुंबई हायकोर्टात गेली. मुख्यमंत्र्यांच्या निवडणुकीची अधिसुचना काढण्यापूर्वी मुंबई हायकोर्टाची अनुमती घेणं निवडणूक आयोगाला आवश्यक वाटलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी निवडणूक आयोगाने आता हायकोर्टात धाव घेतली आहे. पण त्यात काँग्रेसची मात्र घालमेल सुरू झालेली आहे. एकूणच काय मुख्यमंत्री होणं फार सोपं पण आमदार होणं महाकठीणअश्या अनुभवातून पृथ्वीराज चव्हाण सध्या जात आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2011 05:57 PM IST

मुख्यमंत्र्यांना आमदार होण्यासाठी 11 मेची डेडलाईन

12 एप्रिल

कोणत्याही परिस्थितीत 11 मे पूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार होणं बंधनकारक आहे. पण अद्याप निवडणूक आयोगाने त्यांच्या विधानपरिषद निवडणुकीची अधिसूचना जारी केलेली नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये घालमेल सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार होणं आवश्यक आहे. त्यांच्याजागी काँग्रेसने संजय दत्त यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावला. पण संजय दत्त यांच्यासह 10 आमदारांची विधानपरिषदेवरची निवड अवैध ठरवावी यासाठी शिवसेना मुंबई हायकोर्टात गेली.

मुख्यमंत्र्यांच्या निवडणुकीची अधिसुचना काढण्यापूर्वी मुंबई हायकोर्टाची अनुमती घेणं निवडणूक आयोगाला आवश्यक वाटलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी निवडणूक आयोगाने आता हायकोर्टात धाव घेतली आहे. पण त्यात काँग्रेसची मात्र घालमेल सुरू झालेली आहे. एकूणच काय मुख्यमंत्री होणं फार सोपं पण आमदार होणं महाकठीणअश्या अनुभवातून पृथ्वीराज चव्हाण सध्या जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2011 05:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...