असा बालगंधर्व आता न होणे..

असा बालगंधर्व आता न होणे..

12 एप्रिलनितीन चंद्रकांत देसाई प्रॉडक्शनचा बहुचर्चित बालगंधर्व हा सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. यात बालगंधर्वांची भूमिका साकारणार्‍या सुबोध भावेच्या कामाची अनेक मान्यवंरांनी स्तुती केली आहे. बालगंधर्वावर पूर्ण लांबीचा सिनेमा करणं ही वाटते तितकी सोप्पी गोष्ट नव्हती. पण नेहमीच भव्य दिव्य करून दाखवणार्‍या नितीन देसाईंनी हा चंग बांधला आणि आकारास आला. अभिनेता सुबोध भावेच्या रूपाने साक्षात मूर्तीमंत असा बालगंधर्व. नितीन देसाईंनी सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी आपल्या टीमसोबत प्रथम भारतरत्न भीमसेन जोशी यांचा आशिर्वाद घेतला. अण्णांचे आशिर्वाद घेतल्यानंतर सुरू झाली बालगंधर्व सिनेमाला पूर्णत्वास नेण्याची तयारी. दिग्दर्शक रवी जाधव, नितीन देसाई आणि पूर्ण टेक्निकल टीम यासाठी झटत होती. गंधर्वयुगातील ऐश्वर्य दाखवण्यासाठी त्यांच्या काळानुसार सेट, पोशाख दागिन्यांचाही बारकाईने विचार सुरू झाला. गंधर्व नाटक कंपनीतील एक एक कलाकाराला सजवण्यात, ते युग परत तसेच साकारण्यात सगळी टीम गुंतली होती. संगीत हा तर या सिनेमाचा प्राण आहे. कौशल इनामदारच्या नेतृत्वाखाली वादकांसोबत गायकही गंधर्वयुगाचा आलाप आळवत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सारख्या ज्येष्ठांचा सल्ला प्रमाण मानून राजेशाही पॅलेसमध्ये आणि रॉयल गाड्यांतूनही सिनेमाचं शूटिंग झालं. सिनेमाशी संबधित सगळीजणं गंधर्वमय झाली होती. गंधर्व युग साकारण त्याला आत्ताच्या पिढीपर्यंत जशास तसं पोहचवणे हे खर तर जोखमीचं काम होतं त्यामुळे सुबोधपासून सगळी टीम अहोरात्र झटत होती. आणि त्यामुळेच सुबोधला बालगंधर्वाच्या रूपात पाहून गंधर्वांची महती कळते. आणि नकळत का होईना आपण म्हणून जातो. असा बालगंधर्व आता न होणे.

  • Share this:

12 एप्रिल

नितीन चंद्रकांत देसाई प्रॉडक्शनचा बहुचर्चित बालगंधर्व हा सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. यात बालगंधर्वांची भूमिका साकारणार्‍या सुबोध भावेच्या कामाची अनेक मान्यवंरांनी स्तुती केली आहे.

बालगंधर्वावर पूर्ण लांबीचा सिनेमा करणं ही वाटते तितकी सोप्पी गोष्ट नव्हती. पण नेहमीच भव्य दिव्य करून दाखवणार्‍या नितीन देसाईंनी हा चंग बांधला आणि आकारास आला. अभिनेता सुबोध भावेच्या रूपाने साक्षात मूर्तीमंत असा बालगंधर्व. नितीन देसाईंनी सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी आपल्या टीमसोबत प्रथम भारतरत्न भीमसेन जोशी यांचा आशिर्वाद घेतला. अण्णांचे आशिर्वाद घेतल्यानंतर सुरू झाली बालगंधर्व सिनेमाला पूर्णत्वास नेण्याची तयारी.

दिग्दर्शक रवी जाधव, नितीन देसाई आणि पूर्ण टेक्निकल टीम यासाठी झटत होती. गंधर्वयुगातील ऐश्वर्य दाखवण्यासाठी त्यांच्या काळानुसार सेट, पोशाख दागिन्यांचाही बारकाईने विचार सुरू झाला. गंधर्व नाटक कंपनीतील एक एक कलाकाराला सजवण्यात, ते युग परत तसेच साकारण्यात सगळी टीम गुंतली होती. संगीत हा तर या सिनेमाचा प्राण आहे.

कौशल इनामदारच्या नेतृत्वाखाली वादकांसोबत गायकही गंधर्वयुगाचा आलाप आळवत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सारख्या ज्येष्ठांचा सल्ला प्रमाण मानून राजेशाही पॅलेसमध्ये आणि रॉयल गाड्यांतूनही सिनेमाचं शूटिंग झालं. सिनेमाशी संबधित सगळीजणं गंधर्वमय झाली होती.

गंधर्व युग साकारण त्याला आत्ताच्या पिढीपर्यंत जशास तसं पोहचवणे हे खर तर जोखमीचं काम होतं त्यामुळे सुबोधपासून सगळी टीम अहोरात्र झटत होती. आणि त्यामुळेच सुबोधला बालगंधर्वाच्या रूपात पाहून गंधर्वांची महती कळते. आणि नकळत का होईना आपण म्हणून जातो. असा बालगंधर्व आता न होणे.

First published: April 12, 2011, 12:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या