11 एप्रिल
आयपीएलच्या चौथ्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या पहिल्या विजायची नोंद केली आणि किंग खान शाहरुखच्या चेहर्यावर हसू फुललं. घरच्या मैदानावर खेळणार्या कोलकाता नाईट रायडर्सने डेक्कन चार्जर्सचा 9 रन्सनं पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्या कोलकाता नाईट रायडर्सने दमदार बॅटिंग करत 4 विकेटच्या मोबदल्यात 163 रन्स केले.
ऑलराऊंडर जॅक कॅलिसने 54 रन्सची मॅचविनिंग कामगिरी केली. याला उत्तर देताना डेक्कन चार्जर्सच्या टीमला 8 विकेट गमावत 154 रन्स करता आले. भरत चिपली आणि डॅनिअल ख्रिस्टियनने विजयासाठी चांगली झुंज दिली. पण कोलकाताच्या बॉलर्सने दमदार कामगिरी करत डेक्कनला पराभवाचा धक्का दिला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा