मुजोर वाळू माफियांचा हवेत गोळीबार

29 मार्चठाणे जिल्ह्यात विरारमध्ये वैतरणा नदीतून अवैध उपसा करण्यास विरोध करणार्‍यावर वाळू माफियांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. विरार येथील वैतरणा रेती बंदरात वाळू माफियांनी नारंगी रेती व्यावसायिकावर दगडफेक केली. तसेच यावेळी हवेत गोळीबारही केल्याचाही प्रयत्न करण्यात आला. आज दुपारी बारा वाजता वैतरणा रेल्वे पुलालगत सक्शन पंपाने अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती मिळताच नारंगीचे रेती व्यावसायिक हा अवैध उपसा रोखण्यासाठी गेले. पण या वाळू माफियांनी आपल्यावरच हल्ला केल्याची तक्रार नारंगी येथील वाळू व्यावसायिकांनी केला. विरार पोलीस स्टेशनमध्ये मात्र नारंगी व्यावसायिकांची तक्रार दाखल करुन घेण्यात आलेली नाही. तसेच माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलिसांनी काहीच माहिती दिलेली नाही.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Mar 29, 2011 02:58 PM IST

मुजोर वाळू माफियांचा हवेत गोळीबार

29 मार्च

ठाणे जिल्ह्यात विरारमध्ये वैतरणा नदीतून अवैध उपसा करण्यास विरोध करणार्‍यावर वाळू माफियांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. विरार येथील वैतरणा रेती बंदरात वाळू माफियांनी नारंगी रेती व्यावसायिकावर दगडफेक केली. तसेच यावेळी हवेत गोळीबारही केल्याचाही प्रयत्न करण्यात आला. आज दुपारी बारा वाजता वैतरणा रेल्वे पुलालगत सक्शन पंपाने अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती मिळताच नारंगीचे रेती व्यावसायिक हा अवैध उपसा रोखण्यासाठी गेले.

पण या वाळू माफियांनी आपल्यावरच हल्ला केल्याची तक्रार नारंगी येथील वाळू व्यावसायिकांनी केला. विरार पोलीस स्टेशनमध्ये मात्र नारंगी व्यावसायिकांची तक्रार दाखल करुन घेण्यात आलेली नाही. तसेच माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलिसांनी काहीच माहिती दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2011 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...