मतिमंद मुलींच्या सुरक्षेसाठी नवं धोरण बनवणार -गृहमंत्री

मतिमंद मुलींच्या सुरक्षेसाठी नवं धोरण बनवणार -गृहमंत्री

29 मार्चराज्यातील आश्रम शाळांमध्ये राहणार्‍या मतिमंद मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार नवं धोरण बनवणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली. नवी मुंबईतील एका आश्रमातील पाच मुलींवर बलात्कार झाल्याची घटना उघड झाल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. आर आर पाटील यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली आहे. 15 दिवसात हे नवं धोरण तयार केलं जाणार आहे. मुख्यमंत्री मदत निधीतून या मुलींच्या नातेवाईकांना मदत करणार असल्याचंही आर आर पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या आमदार उषा दराडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

  • Share this:

29 मार्च

राज्यातील आश्रम शाळांमध्ये राहणार्‍या मतिमंद मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार नवं धोरण बनवणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली. नवी मुंबईतील एका आश्रमातील पाच मुलींवर बलात्कार झाल्याची घटना उघड झाल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. आर आर पाटील यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली आहे. 15 दिवसात हे नवं धोरण तयार केलं जाणार आहे. मुख्यमंत्री मदत निधीतून या मुलींच्या नातेवाईकांना मदत करणार असल्याचंही आर आर पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या आमदार उषा दराडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2011 11:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading