कोल्हापुरमध्ये इकोफ्रेंडली पंचमी साजरी

24 मार्चआज रंगपंचमी .... होळीनंतर रंगांची मुक्त उधळण करण्यासाठीचा हा सण. मुंबईत जरी धुळवडीला रंग खेळले जात असले तरी राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह अमाप असतो. पण हा उत्सव साजरा करताना रासायनिक रंगांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतात. यावर पर्याय म्हणून अनेक ठिकाणी पर्यावरण प्रेमी इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणुन कोल्हापुरातील निसर्ग मित्र संस्थेने एक अभिनव उपक्रम राबिवला. बेलबाग इथल्या नाईस प्ले स्कुलमध्ये इको फ्रेंडली रंगाचा वापर करुन चेहरा रंगविण्याचा उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये पालकांनी आपल्या मुलांचा चेहरा फक्त नैसर्गीक रंगाचा वापर करुन रंगवला. आपल्या आईकडून चेहरा रंगवून घेताना ही मुलंही आनंदाने हरखून गेली होती. पालकांनी बीट, मेंदी, हळद, पळस, पांगारा, काटेसावर या झाडांपासून तयार करण्यात आलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर करुन आपल्या मुलांचे गोंडस चेहरे रंगवले. याला मुलांनीही उस्फूर्त प्रतिसाद दिला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2011 10:24 AM IST

कोल्हापुरमध्ये इकोफ्रेंडली पंचमी साजरी

24 मार्च

आज रंगपंचमी .... होळीनंतर रंगांची मुक्त उधळण करण्यासाठीचा हा सण. मुंबईत जरी धुळवडीला रंग खेळले जात असले तरी राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह अमाप असतो. पण हा उत्सव साजरा करताना रासायनिक रंगांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतात. यावर पर्याय म्हणून अनेक ठिकाणी पर्यावरण प्रेमी इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे.

याचाच एक भाग म्हणुन कोल्हापुरातील निसर्ग मित्र संस्थेने एक अभिनव उपक्रम राबिवला. बेलबाग इथल्या नाईस प्ले स्कुलमध्ये इको फ्रेंडली रंगाचा वापर करुन चेहरा रंगविण्याचा उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये पालकांनी आपल्या मुलांचा चेहरा फक्त नैसर्गीक रंगाचा वापर करुन रंगवला. आपल्या आईकडून चेहरा रंगवून घेताना ही मुलंही आनंदाने हरखून गेली होती. पालकांनी बीट, मेंदी, हळद, पळस, पांगारा, काटेसावर या झाडांपासून तयार करण्यात आलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर करुन आपल्या मुलांचे गोंडस चेहरे रंगवले. याला मुलांनीही उस्फूर्त प्रतिसाद दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 10:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...