Article 370 : मंत्र्यांनाही नव्हती मोदी- शहांच्या रणनीतीची खबर, कलम 370 असं केलं रद्द

Article 370 : मंत्र्यांनाही नव्हती मोदी- शहांच्या रणनीतीची खबर, कलम 370 असं केलं रद्द

जम्मू-काश्मीरबद्दल सरकारने एवढा मोठा निर्णय घेतला तरीही कुणाला याची साधी कुणकुणही लागली नाही. या 'मिशन काश्मीर'बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी एवढी गुप्तता पाळली की त्यांच्या मंत्र्यांनाही याचा थांगपत्ता नव्हता.

  • Share this:

विक्रांत यादव

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : भारताच्या इतिहासात 5 ऑगस्ट ही तारीख एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल लक्षात ठेवली जाईल. जम्मू-काश्मीरबद्दल सरकारने एवढा मोठा निर्णय घेतला तरीही कुणाला याची साधी कुणकुणही लागली नाही. या मिशन काश्मीरबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी एवढी गुप्तता पाळली की त्यांच्या मंत्र्यांनाही याचा थांगपत्ता नव्हता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मंत्र्यांना याबद्दलची माहिती कॅबिनेटच्या बैठकीतच मिळाली. या कॅबिनेट बैठकीचा अजेंडा कोणत्याही मंत्र्याला पाठवलेला नव्हता. फक्त या बैठकीत कोणतातरी महत्त्वाचा निर्णय होणार आहे एवढंच मंत्र्यांना माहीत होतं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्र्यांना या निर्णयाची माहिती दिली.

'सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय'

या बैठकीच्या आधी अमित शहांनी NDA च्या घटकपक्षांशी संपर्क साधला होता. त्यांनी या नेत्यांनाही फक्त एवढंच सांगितलं होतं की, सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य हवं आहे.

प्रल्हाद जोशी, धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल या मंत्र्यांना राज्यसभेच्या खासदारांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं. त्यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी या विधेयकाबद्दल काहीच सांगण्यात आलं नव्हतं.

Article 370: मोदी आणि अमित शहांबदद्ल पाकिस्तानी मीडिया म्हणतो...

सरकारला हे पक्कं माहीत होतं की हे विधेयक मांडलं जाईल त्यावेळी काँग्रेस याला तीव्र विरोध करेल आणि झालंही तसंच. सरकारने अचानक हे विधेयक आणलं आणि त्याच दिवशी विधेयक मंजूरही करायचं होतं, अशी विरोधकांची तक्रार होती. हे विधेयक नीट वाचायलाही वेळ मिळणार नाही, असंही त्यांचं म्हणणं होतं.

'23 वेळा असं झालं'

यावर सरकारचंही उत्तर तयार होतं. 1975 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींची उमेदवारी अयोग्य ठरवली. तेव्हा सरकारने घटनादुरुस्ती विधेयक आणलं आणि त्याच दिवशी मंजूरही केलं. केवळ हेच नाही तर 23 वेळा असं झालं आहे, असं सरकारने सांगितलं. त्यामुळे विरोधकांचा हा आक्षेपही कुचकामी ठरला.

==============================================================================================================

विरोधकांनी आम्हाला शिकवू नये, अमित शहांचं राज्यसभेतलं UNCUT भाषण

Published by: Arti Kulkarni
First published: August 5, 2019, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading