Article370 नंतर आता 'हे' आहे मोदी सरकार आणि RSSचं पुढचं टार्गेट!

Article370 नंतर आता 'हे' आहे मोदी सरकार आणि RSSचं पुढचं टार्गेट!

कलम 370 आणि कलम 35अ रद्द करणं हा भाजपच्या जाहीरनाम्याचा महत्त्वाचा अजेंडा होता. गेल्या अनेक वर्षांपासून संघाचीदेखील हिच मागणी होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : केंद्र सरकारने काल (सोमवारी ) जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं संविधानातील कलम 370 आणि कलम 35अ रद्द केलं आहे. लडाखला जम्मू काश्मीरपासून वेगळं करण्यात आलं आहे. तसंच आता जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश असणार आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या जाहीरनाम्याचा विचार केला तर भाजप आणि संघाचं मोठं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. कलम 370 आणि कलम 35अ रद्द करणं हा भाजपच्या जाहीरनाम्याचा महत्त्वाचा अजेंडा होता. गेल्या अनेक वर्षांपासून संघाचीदेखील हिच मागणी होती.

यामुळेच राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांचाही उल्लेख केला. त्यामुळे कलम 370 रद्द करून भाजप आणि संघाने मोठा विजय मिळवला आहे असं म्हणायला हरकत नाही.

संघाचे स्वप्न झाले पूर्ण

राज्यसभेमध्ये अमित शहा यांनी विधेयक मांडल्यानंतर संघाकडून याचं कौतुक करण्यात आलं. सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह सुरेश भैयाजी जोशी यांनी यावर पतिक्रिया देताना सरकारचं अभिनंदन केलं आहे. 'काश्मीरबाबत घेतलेला निर्णय हा सरकारचा अतिशय धाडसी निर्णय आहे. त्यासाठी आमच्याकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन. जम्मू काश्मीरसह हे संपूर्ण देशाच्या हिताचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपली राजकीय समीकरणं बाजुला ठेवत या निर्णयाचं स्वागत केलं आहे.'

कलम 370 रद्द व्हावा आणि लडाख वेगळं व्हाव ही आधीपासूनच संघाची महत्त्वाची मागणी ठरली आहे. यासंबंधीचा प्रस्तावदेखील संघाने अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये 2002 साली सादर केला होता. अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही संघाची सगळ्यात महत्त्वाची डिसीजन मेकिंग बॉडी आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखसोबत भेदभाव होत असल्याचं या प्रस्तावात नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे तिथे राहणारे रहिवाशी जम्मू वेगळं आणि लडाख वेगळं राज्य असावं अशी मागणी करत होते.

आता भाजपचं पुढचं टार्गेट

'प्रचंड बहुमताने विजय झाल्यानंतर आता आम्ही असे अनेक कायदे बदलू जे देशाच्या हिताचे असतील' असं भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटलं आहे. तर समान नागरी कायदा आणण्याच्या तयारीत आता भाजप असल्याचंही त्यांनी म्हटलं. तिहेरी तलाकवर बंदी आणण्यात यश येणं ही आमच्या चांगल्या कार्याची सुरुवात असल्याचं संघाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

या सगळ्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदादेखील आणण्यात येईल असंही संघाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. राम मंदिर बनवण्यासाठीदेखील रस्ता साफ होईल. सुप्रीम कोर्टात यावर सकारात्मक निर्णय होईल आणि त्यानंतर अयोध्यात भव्य राम मंदिर होईल अशी अपेक्षा असल्याचं संघाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

VIDEO: तो एक क्षण आणि थोडक्यात बचावले मुख्यमंत्री!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2019 02:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading