नागपूरमध्ये विद्यार्थीनीच्या खून प्रकरणी मारेकरी मोकाट

14 मार्चदिल्लीतल्या राधिका खून प्रकरणाची घटना ताजी असताना नागपूरमध्ये चार दिवसांपूर्वी एका कॉलेज तरुणीचा भरदिवसा खून करण्यात आला. केडीके कॉलेजमध्ये इंजिनिअरिंला शिकणार्‍या माणिका किरणापुरे या विद्यार्थीनीचा भरदिवसा निर्घृण खून करण्यात आला पण पोलिसांना अजून या खूनाचा एकही धागा हाती लागलेला नाही. नंदनवन भागालील पोलीस इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षाला शिकणारी ही विद्यार्थीनी वस्तीगृहामधून कॉलेजला जात असताना मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिचा खून केला. खुनाच्या चार दिवसांनंतरही पोलिसांना अजून आरोपींचा पत्ता लागलेला नाही.चार दिवस लोटल्या नंतर ही पोलिसांना माणिकाच्या खुनाबद्दल एकाही ओरीपाला अटक न झाल्याबद्दल तिच्यासोबत शिकणा-या विद्यार्थामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यानी आज मोर्चा काढून या खुनाबाबत पोलिसांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. अनेक लोकांनी हा खून होताना बघितले आहे पण कोणी ही पुढं येऊन पोलिसांना साक्ष द्यायला तयार नाही.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2011 11:38 AM IST

नागपूरमध्ये विद्यार्थीनीच्या खून प्रकरणी मारेकरी मोकाट

14 मार्च

दिल्लीतल्या राधिका खून प्रकरणाची घटना ताजी असताना नागपूरमध्ये चार दिवसांपूर्वी एका कॉलेज तरुणीचा भरदिवसा खून करण्यात आला. केडीके कॉलेजमध्ये इंजिनिअरिंला शिकणार्‍या माणिका किरणापुरे या विद्यार्थीनीचा भरदिवसा निर्घृण खून करण्यात आला पण पोलिसांना अजून या खूनाचा एकही धागा हाती लागलेला नाही. नंदनवन भागालील पोलीस इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षाला शिकणारी ही विद्यार्थीनी वस्तीगृहामधून कॉलेजला जात असताना मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिचा खून केला. खुनाच्या चार दिवसांनंतरही पोलिसांना अजून आरोपींचा पत्ता लागलेला नाही.

चार दिवस लोटल्या नंतर ही पोलिसांना माणिकाच्या खुनाबद्दल एकाही ओरीपाला अटक न झाल्याबद्दल तिच्यासोबत शिकणा-या विद्यार्थामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यानी आज मोर्चा काढून या खुनाबाबत पोलिसांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. अनेक लोकांनी हा खून होताना बघितले आहे पण कोणी ही पुढं येऊन पोलिसांना साक्ष द्यायला तयार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 11:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...