आ. वाघ आणि त्यांचा पी ए महेश माळीला अटक

आ. वाघ आणि त्यांचा पी ए महेश माळीला अटक

27 फेब्रुवारीबलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी पाचोर्‍याचे आमदार दिलीप वाघ यांना काल मुंबईत वांद्रे क्राइम ब्रांचने अटक केली आणि त्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. तसेच वाघ यांचे पीए महेश माळी यालाही आज नाशिक मध्ये अटक करण्यात आली. या दोघांनाही आज नाशिकच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. नोकरीचं आमिष दाखवून सरकारी विश्रामगृहात एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नाशिक मध्ये ज्या रेस्ट हाऊसमध्ये हे प्रकरण घडलं होतं त्यावेळी महेश हाही वाघ यांच्या सोबत होता असा त्याच्यावर आरोप आहे. वाघ यांचं बीपी वाढल्याने त्यांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हे प्रकरण आपल्याविरूद्धचं राजकीय षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला.

  • Share this:

27 फेब्रुवारी

बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी पाचोर्‍याचे आमदार दिलीप वाघ यांना काल मुंबईत वांद्रे क्राइम ब्रांचने अटक केली आणि त्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. तसेच वाघ यांचे पीए महेश माळी यालाही आज नाशिक मध्ये अटक करण्यात आली. या दोघांनाही आज नाशिकच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. नोकरीचं आमिष दाखवून सरकारी विश्रामगृहात एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नाशिक मध्ये ज्या रेस्ट हाऊसमध्ये हे प्रकरण घडलं होतं त्यावेळी महेश हाही वाघ यांच्या सोबत होता असा त्याच्यावर आरोप आहे. वाघ यांचं बीपी वाढल्याने त्यांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हे प्रकरण आपल्याविरूद्धचं राजकीय षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2011 09:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading